Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tur Soybean Market : तूर वाढली, सोयाबीन कमी; बाजारातील दरांचे नवे समीकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:51 IST

Tur Soybean Market : बाजार समितीत तुरीच्या दराने चांगलीच पकड कायम ठेवली आहे. कमाल भाव ८,४४१ रुपयांपर्यंत पोहोचला असताना सोयाबीनची आवक अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली.(Tur Soybean Market)

Tur Soybean Market : लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ मार्च रोजी शेतमालाची मोठी लगबग पाहायला मिळाली. सोयाबीनची आवक जेमतेम होती. तुरीच्या दरातील तेजी मात्र कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Tur Soybean Market)

बाजार समितीत शुक्रवारी सर्वाधिक आवक सोयाबीनची झाली. दिवसभरात एकूण १४,११३ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविली गेली. सोयाबीनला किमान ५,३७० रुपये, तर कमाल ५,६२५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. रुपयांवर सर्वसाधारण भाव ५,५०० स्थिरावला आहे. 

तूर आणि हरभऱ्याची स्थिती...! 

तुरीच्या दराने चांगली पकड कायम ठेवली आहे. ३,०१० क्विंटल आवक झाली असून, कमाल भाव ८,४४१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला, तर किमान ७,४०० आणि सर्वसाधारण दर ७,९५० रुपये प्रति क्विंटल होता. 

हरभरा 

हरभऱ्याची ८,४२९ क्विंटल आवक झाली असून, त्याला ५,२५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. 

तृणधान्य व इतर कडधान्ये

ज्वारीच्या विविध वाणांमध्ये मोठी तफावत दिसून आली. ज्वारी रब्बीला ४,१५० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला, तर पिवळ्या ज्वारीची आवक अवधी ८ क्विंटल असली तरी तिला ४,३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. गव्हाची १८३१ क्विंटल आवक झाली असून कमाल भाव ३,००० रुपये इतका राहिला, तर सर्वसाधारण दर २,९०० रुपये प्रति क्विंटल होता.

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Bajarbhav : हरभऱ्याची २७ हजार क्विंटल आवक; दर वाढले की घसरले? जाणून घ्या

अधिक वाचा : Vidarbha Heat Wave : मार्चमध्येच ४०° पार; विदर्भात उष्णतेचा जोर, वाशिम 'हॉट' जिल्ह्यांत

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Rises, Soybean Falls: New Market Rate Equation Detailed

Web Summary : Latur market saw good tur prices, reaching ₹8,441/quintal, while soybean prices were moderate at ₹5,500/quintal. Chickpea traded at ₹5,250/quintal. Jowar varied, with the highest price being ₹4,150, and wheat averaged ₹2,900/quintal.
टॅग्स :शेती क्षेत्रहरभरातूरगहूसोयाबीनबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड