Tur Market : नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती (Tur Market) कमी होत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. आजपासून सप्टेंबर महिना सुरु झाला असून या महिन्यात तुरीला काय मिळू शकतात, याचा संभाव्य अंदाज वर्तविण्यात आला आहे. ते सविस्तर जाणून घेऊयात...
खरीप हंगाम (Kharif Season) २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमतीपेक्षा (८ हजार रुपये प्रतिक्विंटल) असून सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत. मागील वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये आयाती मध्ये वाढ झालेली असून निर्यात कमी कमी झालेली आहे. तर
मागील तीन वर्षातील बाजारातील तुरीच्या सप्टेंबरमधील सरासरी किंमती पाहुयात. यामध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये ७ रुपये ३१४ रुपये प्रति क्विंटल, सप्टेंबर २०२३ मध्ये १० हजार ५०० रुपये प्रति क्विंटल सप्टेंबर २०२४ मध्ये १० हजार ११९ रुपये प्रति क्विंटल अशा होत्या. तर यंदाच्या सप्टेंबर २०२५ मध्ये बाजारातील संभाव्य किंमती ६ हजार ४३५ ते ६ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तुरीसाठी आहे
तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे.
तसेच महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन १०.१० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये १३.३ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. माहे डिसेंवर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष ऑगस्ट (१८ ऑगस्ट २०२५) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली असून त्यामध्ये उतरता कल दिसून येतो.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी तूर पिकाचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.