Join us

Tur Market : तुरीच्या दरात सुधारणा! लातूरमध्ये सर्वाधिक दर; बाजार समित्यांमध्ये १६ टक्क्यांनी आवक घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:46 IST

Tur Market : राज्यातील तूर बाजारात मागील आठवड्यात अनेक बदल पाहायला मिळाले. लातूरने सर्वाधिक दर नोंदवत शेतकऱ्यांना दिलासा दिला, तर हिंगोलीमध्ये दरात घसरण झाली. दरात ३.३ टक्क्यांची वाढ झाली असली तरी एकूण आवक मात्र १६ टक्क्यांनी घटली आहे. पुढे दर वाढतील की घटतील? जाणून घ्या संपूर्ण ट्रेंड... (Tur Market)

Tur Bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात मागील आठवड्यात किंचित सुधारणा दिसून आली आहे. विशेषतः लातूरबाजार समितीमध्ये तुरीच्या सरासरी दरात ३.३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून, यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.(Tur Market)

लातूरमध्ये तुरीला मिळाला सर्वाधिक दर

१३ जुलै रोजी लातूर बाजार समितीत तुरीचा सरासरी दर ६ हजार ५५५ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदविला गेला. मागणी वाढलेली असताना आवक मात्र, घटल्यामुळे या दरात सुधारणा झाली आहे. लातूरसह काही इतर बाजार समित्यांमध्येही सुधारणा दिसली, मात्र हिंगोलीत दरात घट झाल्याचे दिसून आले.(Tur Market)

साप्ताहिक दर तुलना (प्रमुख बाजार समित्या)

बाजार समितीसरासरी दर (रु./क्विंटल)
लातूर६,५५५
उस्मानाबाद६,४४९
अकोला६,४६५
खामगाव५,७६०
हिंगोली५,२०८

लातूरमध्ये दर सर्वाधिक, तर हिंगोलीमध्ये सर्वात कमी नोंदविण्यात आले.

तुरीची आवक घटली; फक्त ९.६ हजार टन

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची एकूण आवक १६ टक्क्यांनी घटली आहे. मागील आठवड्यात देशभरात तुरीची आवक १३.१ हजार टन होती. परंतु १३ जुलै अखेर ती केवळ ९.६ हजार टनांवर आली आहे. त्यामुळे पुरवठा घटल्याने दरात किंचित वाढ झाली आहे.

MSP च्या जवळपास बाजारभाव; शेतकऱ्यांना दिलासा

तुरीसाठी सरकारने २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे. सध्या बाजारभाव हा या पातळीवर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर आवकेत वाढ; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती