Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tur Market : तूर उत्पादकांना दिलासा; मोंढ्यात दररोज बीट सुरू वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:21 IST

Tur Market : अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले, पण तुरीला बाजारात चांगला भाव मिळतोय. हिंगोली मोंढ्यात आवक वाढल्याने दररोज खरेदी-विक्री सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Tur Market)

Tur Market : हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात गेल्या चार दिवसांपासून तुरीची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. (Tur Market)

वाढती आवक लक्षात घेता बाजार समिती प्रशासनाने मोंढ्यातील एक क्रमांकाच्या शेडमध्ये दररोज तुरीचे बीट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुरीची खरेदी-विक्री सुरळीतपणे सुरू असून शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. (Tur Market)

जिल्ह्यातील बहुतांश भागांत तूर काढणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका तूर पिकाला बसला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (Tur Market)

मात्र, उत्पादन कमी असले तरी सध्या बाजारात तुरीला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकरी काढणी होताच तूर थेट मोंढ्यात विक्रीसाठी आणत आहेत. (Tur Market)

आवक २०० ते २५० क्विंटलवर

सध्या बाजार समितीच्या मोंढ्यात दररोज २०० ते २५० क्विंटलपर्यंत तुरीची आवक होत आहे. वाढती आवक असूनही दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजार समिती प्रशासनानेही आवक वाढीच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन केल्याने व्यवहार सुरळीत पार पडत आहेत.

दरात वाढ, सरासरी ७ हजार रुपये भाव

गेल्या आठवड्याभरात तुरीच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. १७ डिसेंबर रोजी सुमारे २५० क्विंटल तुरीची आवक झाली होती. यावेळी तुरीला किमान ७ हजार रुपये तर कमाल ७ हजार ५९५ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तर सरासरी भाव ७ हजार रुपये राहिला. सध्या सुरू असलेल्या या दरामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळत आहे.

दररोज खरेदी-विक्रीचे व्यवहार

वाढती आवक आणि शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता बाजार समितीने एक क्रमांकाच्या शेडमध्ये दररोज तूर खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर वेळेवर विक्री करता येत असून व्यापाऱ्यांनाही सोयीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकूणच, उत्पादनात घट असूनही बाजारात मिळणाऱ्या समाधानकारक दरामुळे हिंगोली जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर :Tur Market : तुरीची आवक दुप्पट; हमीभाव मिळतोय काय? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Arrival Surges in Market; Prices Satisfactory

Web Summary : Hingoli market sees increased tur arrival due to harvesting completion. Despite crop damage from excessive rain, farmers are selling as prices are satisfactory, averaging ₹7,000 per quintal. Daily tur trading now occurs at the market shed.
टॅग्स :शेती क्षेत्रतूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डहिंगोली