Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tur Bajarbhav : यंदाच्या एप्रिल महिन्यात तुरीचे दर कसे राहतील, MSP च्या पुढे जातील का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:25 IST

Tur Bajarbhav : मागील तीन वर्षातील एप्रिल महिन्याचे दर आणि आणि यंदाच्या एप्रिल महिन्यात दर कसे राहतील, ते पाहुयात... 

Tur Bajarbhav :    खरीप हंगाम २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) (८ हजार रुपये प्रति क्विंटल) असून सध्याच्या तुरीच्या किंमती MSP च्या दिशेने जाताना दिसून येत आहे. मागील तीन वर्षातील एप्रिल महिन्याचे दर आणि आणि यंदाच्या एप्रिल महिन्यात दर कसे राहतील, ते पाहुयात... 

गतवपीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव वाढण्यास सुरवात झाली आहे. मागील तीन वर्षातील लातूर वाजारपेठेतील तुरीच्या एप्रिल मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे : 

  • एप्रिल २०२३ मध्ये ८ हजार ४१५ रुपये प्रति क्विंटल
  • एप्रिल २०२४ मध्ये १० हजार ७१ रुपये प्रति क्विंटल
  • एप्रिल २०२५ मध्ये ७ हजार १३३ रुपये प्रति क्विंटल

तर एप्रिल २०२६ मध्ये पुढील महिन्यात तुरीच्या संभाव्य किंमती : ७ हजार ८०० ८ हजार २९० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.  तूरीच्या किंमती MSP च्या आसपास मर्यादित श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये तुरीच्या आयाती मध्ये वाढ झालेली असून निर्यात कमी कमी झालेली आहे. 

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंवर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारच्या अंदाजानुसार, २०२५-२६ या वर्षात देशात तूरीचे उत्पादन सुमारे ३४.५५ लाख टन इतके राहण्याचा अंदाज असून ते मागील वर्षाच्या तुलनेत घट दर्शवते. तसेच महाराष्ट्रात तूरीचे उत्पादनात सुमारे ११.३ लाख टनांची लक्षणीय घट अपेक्षित असून, यामुळे राज्यस्तरावर पुरवठ्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे. 

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून एप्रिल २०२६ या कालावधीसाठी तूर पिकांच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Prices: Will April Rates Exceed MSP? Detailed Analysis

Web Summary : Tur prices are nearing MSP. April 2026 rates are projected at ₹7,800-₹8,290 per quintal. Increased imports and decreased exports impact prices. Production is expected to decline in 2025-26, especially in Maharashtra.
टॅग्स :तुरामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती