Tur Market : ऑक्टोबर २०२५ पासून तुरीच्या किंमती कमी होत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. वर्ष २०२४-२५ मध्ये तुरीच्या आयाती मध्ये वाढ झालेली असून निर्यात कमी कमी झालेली आहे. या जानेवारी महिन्यात दर कसे मिळतील, ते पाहुयात...
मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जानेवारी मधील सरासरी किंमती पाहिल्या तर, जानेवारी २०२३ मध्ये ७ हजार २९८ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी २०२४ मध्ये ९ हजार ३५८ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी २०२५ मध्ये ७ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल अशा होत्या. तर या नवीन वर्षाच्या सुरवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात तुरीच्या संभाव्य किंमती ६ हजार ३०० ते ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.
सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तुरीसाठी आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु.८०००/क्विंटल) असून सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत. माहे डिसेंवर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष डिसेंबर २०२४ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली आहे.
तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंवर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील सन २०२४-२५ मध्ये १३.३ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जानेवारी २०२६ या कालावधीसाठी तूर पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.
Web Summary : Tur prices are expected to range from ₹6,300 to ₹6,900 per quintal in January. Increased imports and higher production estimates contribute to lower prices compared to last year, despite being below the MSP. Market analysis predicts potential prices for FAQ grade Tur.
Web Summary : जनवरी में तुअर की कीमतें ₹6,300 से ₹6,900 प्रति क्विंटल रहने की उम्मीद है। बढ़े हुए आयात और उच्च उत्पादन अनुमानों के कारण पिछले वर्ष की तुलना में कीमतें कम हैं, हालांकि एमएसपी से नीचे हैं। बाजार विश्लेषण FAQ ग्रेड तुअर के लिए संभावित कीमतों की भविष्यवाणी करता है।