Join us

Tur Market 2025 : यावर्षी तुरीचे भाव कसे राहतील? किती उत्पादन राहील? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:47 IST

Tur Market 2025 : तुरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात (tur Import) तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो.

Tur Market 2025 : डिसेंबर 2022 पासून तुरीला समाधानकारक दर (Tur Bajarbhav) आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील दराचा विचार करता यावर्षी म्हणजेच जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 09 हजार रुपये ते 10 हजार 500 रुपयांपर्यंत दर असण्याची शक्यता आहे. 

भारत हा जगातील सर्वात मोठा तुर उत्पादक (Tur Farmers) तसेच उपभोक्ता देश आहे.  भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा 60 टक्के पेक्षा जास्त आहे. तुरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात (tur Import) तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष नोव्हेंबर 2024 मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये 1.04 लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 1.8 लाख टन होती. 

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी घेऊन ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन 2023-24 मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे 34.17 लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील 2022-23 मधील उत्पादन 8.6 लाख टनांवरून सन 2023-24 मध्ये 10.1 लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

अशा राहतील किमती 

दरम्यान डिसेंबर 2022 पासून तुरीच्या किमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जानेवारी ते मार्च मधील सरासरी किमती पाहिल्या असता जानेवारी ते मार्च 2022 मध्ये 06 हजार 310 रुपये प्रतिक्विंटल, जानेवारी ते मार्च 2023 7 हजार 735 रुपये प्रतिक्विंटल, जानेवारी ते मार्च 2024 मध्ये 8966 रुपये प्रतिक्विंटल, तर जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 09 हजार रुपये ते 10 हजार 500 रुपयांपर्यंत दर असण्याची शक्यता आहे.

Maka Bajarbhav : जानेवारी ते मार्चमध्ये मक्याचे बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :तुरामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीलातूर