Tur Market : सद्यस्थितीत लाल तुरीला क्विंटलमागे कमीत कमी ६ हजार ८४० रुपये तर सरासरी ७ हजार ३५० रुपये तर पांढऱ्या तुरीला परांडा मार्केटमध्ये ७ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. आता पुढचे दहा दिवस हे दर कसे राहतील, हे थोडक्यात पाहुयात.....
यंदा तुरीला किमान आधारभूत किंमत ८ हजार रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र आधारभूत किंमतीपेक्षा सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षात जानेवारी २०२३ मध्ये ७ हजार २९८ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी २०२४ मध्ये ९ हजार ३५८ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी २०२५ मध्ये ७ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल अशा होत्या.
तर जानेवारी महिन्यातील शेवटचे दहा दिवस शिल्लक असून या दिवसांत तुरीच्या संभाव्य किंमती ६ हजार ३०० ते ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या दरम्यान सध्या दर मिळत असल्याचे चित्र आहे. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तुरीसाठी आहे.
माहे डिसेंवर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष डिसेंबर २०२४ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली आहे. तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंवर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. तसेच महाराष्ट्रातील सन २०२४-२५ मध्ये १३.३ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : Tur prices may range from ₹6,300 to ₹6,900 per quintal in January's last ten days. December-April is the peak season. This year's arrivals exceed last year's. MSP is ₹8,000.
Web Summary : जनवरी के अंतिम दस दिनों में तुअर की कीमतें ₹6,300 से ₹6,900 प्रति क्विंटल तक हो सकती हैं। दिसंबर-अप्रैल चरम मौसम है। इस साल की आवक पिछले साल से अधिक है। MSP ₹8,000 है।