Tur Market : भारतामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन (Tur Production) सन २०२४-२५ मध्ये वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील लातूर बाजारपेठेमधील तुरीच्या किंमती (Tur Markets) मागील आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात कसे दर मिळाले, ते पाहुयात....
सध्या तुरीला मिळत असलेल्या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा (Tur MSP) कमी आहेत. तर खरीप हंगाम २०२४-२५ साठी किंमान आधारभूत किंमत ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल आहे. मागील आठवड्याच्या तुलतेन राष्ट्रीय पातळीवर तुरीच्या आवकेमध्ये २३.६२ टक्के वाढ झालेली दिसून येत आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असून दुसरीकडे तुरीच्या दरात मात्र उदासीनता पाहायला मिळत आहे. तुरीची आवक सुरू असल्यापासून बाजारातील दर हे असमानकारक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे .आता मागील आठवड्यातील काही निवडक बाजार समित्यांमधील दर पाहिले असता लातूर बाजारात ६ हजार ९६६ प्रतिक्विंटल रुपये दर मिळाला.
तर अमरावती बाजारात ६ हजार ९४८ रुपये प्रतिक्विंटल, हिंगणघाट बाजारात ६ हजार ३७५ रुपये प्रतिक्विंटल, खामगाव बाजारात ६ हजार ७३३ रुपये प्रति क्विंटल, तर अकोला बाजारात ७ हजार ३२ रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळाला.
PM Kisan : पीएम किसानचा 20 वा हफ्ता कधी येणार? पेंडिंग हफ्त्यांचे काय? वाचा सविस्तर