Join us

Tur Market : तुरीच्या दरात घसरण सुरूच, लातूर जिल्ह्यात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 21:17 IST

Tur Market : तुरीच्या दरात सातत्याने घसरण (Tur Market Down) सुरूच असून आज थेट 07 हजार 800 रुपयांवर बाजार भाव येऊन ठेपला आहे.

Tur Market :  तुरीच्या दरात सातत्याने घसरण (Tur Market Down) सुरूच असून आज थेट सात हजार आठशे रुपयांवर बाजार भाव येऊन ठेपला आहे. आज रविवार 5 जानेवारी 2024 रोजी तुरीला तुरीला कमीत 06 हजार 800 रुपयांपासून ते 7 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार पहिल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पांढऱ्या तुरीची (Latur Tur Market) 195 क्विंटल, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाच क्विंटल, लातूर जिल्ह्यात 51 क्विंटल अशी 251 क्विंटलची आवक झाली. यात सिल्लोड बाजारात सर्वसाधारण तुरीला कमीत कमी 06 हजार 750 रुपये ते सरासरी 06 हजार 800 रुपये दर मिळाला. 

देवणी बाजारात कमीत कमी 7 हजार 600 रुपयापासून ते सरासरी 07 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर शेवगाव बाजारात पांढऱ्या तुरीला  सरासरी 06 हजार 800 रुपये तर शेवगाव-भोदेगाव बाजारात 06 हजार 900 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/01/2025
अहमदनगरपांढराक्विंटल195685071006850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल5675070006800
लातूर---क्विंटल51760180017801
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)251
टॅग्स :तुरामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती