Tur Kharedi : शासकीय हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होऊन महिनाभर उलटला तरी जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.(Tur Kharedi)
१८ फेब्रुवारीपर्यंत राज्य कृषी पणन मंडळ व मार्केटिंग फेडरेशनकडे एकूण १ हजार ६६२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, अद्याप एकही क्विंटल तुरीची प्रत्यक्ष खरेदी झालेली नाही. (Tur Kharedi)
बाजारभाव आणि हमीभाव 'समसमान'
सध्या जिल्ह्यातील बाजारात तुरीला किमान ७,०००, कमाल ८,२०० आणि सरासरी ८,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
सरकारच्या हमीदर केंद्रांवरही प्रतिक्विंटल ८,००० रुपये दराने खरेदी जाहीर आहे. बाजारभाव आणि हमीदरात फारसा फरक नसल्याने अनेक शेतकरी थेट व्यापाऱ्यांना विक्री करणे पसंत करत आहेत. परिणामी शासकीय केंद्रांवर आवक अत्यल्प राहिली आहे.
ई-पीक नोंदणीतील अडचणी
अनेक शेतकऱ्यांनी पेरणीनंतर सातबारा उताऱ्यावर तुरीची नोंद केली नसल्याने ई-पीक पाहणीत तूर दिसत नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीत तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. नोंदणी असूनही प्रत्यक्ष खरेदी न होण्यामागे हेही एक कारण मानले जात आहे.
उत्पादनस्थिती
यंदा अतिवृष्टीमुळे सखल भागातील तूर पिकाचे नुकसान झाले; मात्र हलक्या जमिनीवरील पिकातून समाधानकारक उत्पादन मिळाल्याचे चित्र आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा चांगले असतानाही खरेदी केंद्रांवर माल न येणे ही चिंतेची बाब ठरत आहे.
गतवर्षीची तुलना
मागील वर्षी राज्य सहकारी विपणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) कडे २०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६० शेतकऱ्यांकडून ५३९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. यावर्षी नोंदणी संख्या अधिक असली तरी प्रत्यक्ष खरेदी शून्यावर आहे.
अकोला जिल्ह्यातील स्थिती
अकोला जिल्ह्यात सरकारी केंद्रांवर हमी दराने तुरीची खरेदी सुरू झाली असली तरी २० फेब्रुवारीपर्यंत केवळ ३ हजार १०० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.
बाजारात मिळणारा दर आणि हमीदर जवळपास सारखाच असल्याने शासकीय केंद्रांवर आवक मर्यादित राहिली आहे.
पुढील दिशा
शेतकऱ्यांची १ मेपर्यंत तुरीची खरेदी केली जाणार आहे. भविष्यात दरात चढ-उतार झाल्यास हमीभावाचे कवच शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकते. नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी प्रत्यक्ष खरेदी न झाल्याने हमीभाव केंद्रांवरील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. - एस.व्ही. बदनाळे, जिल्हा उपनिबंधक, लातूर
बाजारभाव आणि हमीदर यातील नगण्य फरक, तांत्रिक अडचणी आणि थेट व्यापाऱ्यांना विक्रीचा कल या कारणांमुळे तुरीच्या सरकारी खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पुढील काही दिवसांत खरेदीला गती मिळते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : Tur Market : ९ हजारांचा पल्ला गाठूनही तुरीची पडझड; भाववाढीची आशा फोल?
Web Summary : Despite MSP for tur, low arrivals plague procurement centers. Equal market rates, e-crop registration issues, and direct sales to traders hinder government purchases. Akola sees limited procurement. Future price fluctuations may benefit farmers registering.
Web Summary : तुअर के लिए एमएसपी के बावजूद, खरीद केंद्रों पर कम आवक। समान बाजार दरें, ई-फसल पंजीकरण मुद्दे और व्यापारियों को सीधी बिक्री सरकारी खरीद में बाधा डालती हैं। अकोला में सीमित खरीद। भविष्य में मूल्य में उतार-चढ़ाव से किसानों को लाभ हो सकता है।