Join us

Tur Bajarbhav : ...म्हणून तुरीच्या दरात घसरण, मागील आठवड्यात कसे मिळाले दर? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 20:18 IST

Tur Bajarbhav : मागील आठवड्याच्या तुलतेन राष्ट्रीय पातळीवर तुरीच्या आवकेमध्ये 20.82  टक्के वाढ झालेली दिसून येत आहे.

Tur Bajarbhav :  गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन (Tur Production) यावर्षी सारखेच राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील लातूर बाजारपेठेमधील तुरीच्या किंमती  (Tur Market Rate) मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्याच्या तुलतेन राष्ट्रीय पातळीवर तुरीच्या आवकेमध्ये 20.82  टक्के वाढ झालेली दिसून येत आहे.

सध्याच्या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा (Tur MSP rate) कमी आहेत. खरीप हंगाम 2024-25 साठी किंमान आधारभूत किंमत 7550 रुपये प्रति क्विं. आहे. तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असून मागील आठवड्यात तुरीच्या सरासरी किमती पाहिल्या असता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 7 हजार 500 ते 7 हजार 600 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काहीशी घसरण होऊन हादर 7 हजार रुपयांपासून ते सात हजार 300 रुपयांपर्यंत मिळाला. तर तिसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा घसरून हा दर 7200 रुपयांपर्यंत येऊन ठेपला. तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 07 हजार रुपयांपासून ते 07 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

तर या आठवड्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुरीला सरासरी 07 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यातील निवडक बाजारातील तुरीच्या सरासरी किमती पाहिल्या असता लातूर बाजारात 7240 रुपये, अमरावती बाजारात 7307 रुपये, हिंगणघाट बाजारात 7225 रुपये खामगाव बाजारात 6 हजार 427 रुपये तर अकोला बाजारात 7312 रुपये दर मिळाला.

टॅग्स :तुरामार्केट यार्डशेती क्षेत्रलातूर