Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tur Bajar Bhav : तूर बाजारात कुठे मिळाले ८ हजार पार भाव? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:08 IST

Tur Bajar Bhav : तुरीचे भाव कुठे वाढले आणि कुठे घसरले? जाणून घ्या आजचा संपूर्ण तूर बाजारभाव ट्रेंड.(Tur Arrivals)

Tur Bajar Bhav : राज्यात तूरबाजारात आज (१३ फेब्रुवारी) रोजी मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. काही बाजार समित्यांमध्ये तुरीला तब्बल ८ हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला, तर काही ठिकाणी दरावर दबाव दिसून आला.(Tur Bajar Bhav)

वाढती आवक (Tur Arrivals) आणि दर्जेदार मालाला असलेली मागणी यामुळे बाजाराचे चित्र बदलताना दिसत आहे. (Tur Bajar Bhav)

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची मोठ्या प्रमाणात आवक (Tur Arrivals) झाली असून काही जातींना चांगली मागणी मिळाल्यामुळे दरात वाढ झाली. तर काही बाजारात दर स्थिर किंवा कमी झाल्याचे दिसून आले.

एकूण आवक किती झाली?

आज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सुमारे १४ हजार ८२५ क्विंटल तुरीची आवक (Tur Arrivals) झाली. वाढलेल्या आवक असूनही चांगल्या प्रतीच्या तुरीला व्यापाऱ्यांकडून मागणी कायम असल्याचे दिसले.

कोणत्या जातीला जास्त मागणी?

आज बाजारात लाल तूर आणि गज्जर तूर या जातींना सर्वाधिक मागणी दिसून आली. विशेषतः दर्जेदार लाल तुरीला चांगला प्रतिसाद मिळाला. काही बाजारात पांढऱ्या तुरीलाही स्थिर मागणी राहिली.

कुठे दर वाढले?

अकोला येथे लाल तुरीला ८ हजार ३५० रुपयांपर्यंत दर मिळाला.

अमरावती बाजारात ८ हजार २५० रुपयांपर्यंत दर नोंदविला गेला.

नागपूर येथे लाल तूर ७ हजार ९९९ रुपयांपर्यंत पोहोचली.

मुरुम बाजारात गज्जर तुरीला सर्वाधिक ८ हजार ३७५ रुपयांचा दर मिळाला.

दुधणी बाजारात लाल तुरीला तब्बल ८ हजार ७०० रुपयांचा उच्चांक दर मिळाला.

कुठे दर घटले किंवा स्थिर राहिले?

चंद्रपूर येथे तुरीचा सरासरी दर ७ हजार २९ रुपये राहिला.

मोहोळ बाजारात काळ्या तुरीला केवळ ६ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

काही ठिकाणी वाढलेल्या आवकेमुळे दरावर दबाव निर्माण झाल्याचे दिसून आले.

प्रमुख बाजारातील दर स्थिती

कारंजा बाजारात सरासरी ८ हजार रुपये दर मिळाला.

वरूड-राजूरा बाजारात ७ हजार २८५ रुपये दर नोंदला गेला.

सोलापूर येथे लाल तुरीचा सरासरी दर ७ हजार ३५० रुपये राहिला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2026
चंद्रपूर---क्विंटल53660074907029
पैठण---क्विंटल50782178217821
कारंजा---क्विंटल2575690580008000
वरूड-राजूरा बझार---क्विंटल222590578907285
वडवणी---क्विंटल5700078017700
हिंगोलीगज्जरक्विंटल480740079907695
मुरुमगज्जरक्विंटल318720183758375
मोहोळकाळीक्विंटल35550065006300
मंठाकाळीक्विंटल6800080008000
सोलापूरलालक्विंटल6700074507350
अकोलालालक्विंटल2200700083508155
अमरावतीलालक्विंटल804800082508125
जळगाव - मसावतलालक्विंटल40750075007500
नागपूरलालक्विंटल5294750079997874
जिंतूरलालक्विंटल59746080608060
मेहकरलालक्विंटल190700077457550
नांदगावलालक्विंटल190159978007350
मंठालालक्विंटल139730077007550
तुळजापूरलालक्विंटल32750079007825
सेनगावलालक्विंटल60760079007800
पाथरीलालक्विंटल2770077007700
बुलढाणालालक्विंटल120700077007350
बाभुळगावलालक्विंटल880760179957801
राजूरालालक्विंटल61620075857335
आष्टी (वर्धा)लालक्विंटल80700076807350
सिंदीलालक्विंटल49700079057510
दुधणीलालक्विंटल319650087008253
काटोललोकलक्विंटल380640075267350
शेवगावपांढराक्विंटल60770077007700
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल9770078007700
देउळगाव राजापांढराक्विंटल50650078417500
मंठापांढराक्विंटल16610075507300
तुळजापूरपांढराक्विंटल38750079007850
पाथरीपांढराक्विंटल2720076007200
देवळापांढराक्विंटल1701072407125

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Cotton Market : कापूस बाजारात मोठा उलटफेर; तेजीला ब्रेक लागणार का? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Market Rates: Where did Tur prices cross 8,000?

Web Summary : Tur market sees fluctuations. Some markets hit ₹8,000+ due to demand for quality Tur, while others faced pressure. Arrivals totaled 14,825 quintals. Red and Gajjar Tur saw high demand. Akola and Dudhani recorded top prices.
टॅग्स :शेती क्षेत्रतूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती