Join us

Tur bajar bhav : तुरीची आवक कमी; लाल-पांढऱ्या तुरीला चांगला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:36 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२२ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) मोठी घसरण दिसून आली आहे. आज एकूण तुरीची आवक ८ हजार २७८ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. तर सरासरी दर हा ६ हजार १७८ प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी घट झाली आहे. तुरीची एकूण आवक कमी होऊन ८ हजार २७८ क्विंटल वर आली. मात्र दरात फारशी घसरण न होता सरासरी दर ६ हजार १७८ प्रति क्विंटल मिळाला. (Tur Arrival)

जास्त मागणी 'लाल' आणि 'पांढऱ्या' तुरीला

आजही बाजारात लाल तुरीला सर्वाधिक मागणी दिसून आली. काही बाजारात पांढऱ्या तुरीलाही चांगला दर मिळाला. गज्जर तुरीसुद्धा काही बाजारात चांगल्या दरात विकली गेली.

प्रमुख बाजार समित्यांमधील आजची आवक व दर (प्रति क्विंटल)

अमरावती (लाल) : सर्वाधिक आवक ३ हजार ५०४ क्विंटल, दर: ६ हजार ४३४ रु.

अकोला (लाल) : ९९१ क्विंटल, दर: ६ हजार ५४५ रु.

कारंजा : ९७५ क्विंटल, दर: ६ हजार ४२५ रु.

दुधणी (लाल) : ८८० क्विंटल, दर: ६  हजार २१ रु.

बाभुळगाव (लाल) : ४०० क्विंटल, दर: ६,२०१रु.

मुरुम (गज्जर) : ३८० क्विंटल, दर: ६,३५२रु.

हिंगोली (गज्जर) : ३०० क्विंटल, दर: ६,०५०रु.

औराद शहाजानी (पांढरा) : ११२ क्विंटल, दर: ६,५०३रु.

तुळजापूर (पांढरा) : ४९ क्विंटल, दर: ६,४००रु.

 किमान व कमाल दर

सर्वात कमी दर : ४ हजार ८०० रु. (मालेगाव)

सर्वात जास्त दर : ६ हजार ९०५ रु. (अकोला)

कोणत्या जातीला चांगली मागणी? लाल तुरीला आजही सर्वाधिक मागणी व दर मिळाला.

पांढऱ्या तुरीलाही काही बाजारांत जसे की औराद शहाजानी, तुळजापूर येथे चांगले दर मिळाले.

गज्जर तुरीची आवक काही ठिकाणी झाली आणि तीही स्थिर दरात खरेदी झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/07/2025
दोंडाईचा---क्विंटल7560058005600
चंद्रपूर---क्विंटल6585058505850
भोकर---क्विंटल5610061006100
कारंजा---क्विंटल975598066856425
हिंगोलीगज्जरक्विंटल300580063006050
मुरुमगज्जरक्विंटल380600065156352
सोलापूरलालक्विंटल70580565006250
अकोलालालक्विंटल991600069056545
अमरावतीलालक्विंटल3504635065196434
जळगावलालक्विंटल33600060006000
यवतमाळलालक्विंटल205620064006300
मालेगावलालक्विंटल12480054415391
चिखलीलालक्विंटल36540064515900
वणीलालक्विंटल111600064456230
मेहकरलालक्विंटल60550062806100
निलंगालालक्विंटल15620063506300
औराद शहाजानीलालक्विंटल43600164356218
नेर परसोपंतलालक्विंटल71620063956332
बाभुळगावलालक्विंटल400600163506201
दुधणीलालक्विंटल880530067006021
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल3587163615900
शेवगावपांढराक्विंटल17550063006300
औराद शहाजानीपांढराक्विंटल112630167056503
तुळजापूरपांढराक्विंटल49600065006400

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : सप्टेंबर २०२५ पर्यंत कापसाला प्रति क्विंटल काय भाव मिळतील, वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतूरतुराबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड