Join us

Tur bajar bhav : तुरीची तुफान आवक; 'या' बााजरात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:23 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (७ ऑगस्ट) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival)  मोठी वाढ होताना दिसली. बाजारात तुरीची आवक २२ हजार १७१ क्विंटल झाली तर त्याला ६ हजार २४५ प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवक (Tur Arrival)  व दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. तब्बल २२ हजार १७१ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली असून, सरासरी दर ६ हजार २४५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. काही बाजारांमध्ये तुरीला तब्बल ८ हजार ते ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला आहे.

कोणत्या जातीत मागणी होती?

लाल तूर: सर्वाधिक व्यवहार या जातीच्या तुरीचा झाला. अनेक बाजारांमध्ये ६ हजार ५०० रुपये पेक्षा जास्त दर मिळाला.

पांढरी तूर: जालना, माजलगाव, औराद शहाजानी याठिकाणी पांढऱ्या तुरीला चांगला दर मिळाला.

लोकल तूर: सांगली, वर्धा, काटोल या बाजारांमध्ये लोकल तुरीला मागणी वाढली. सांगली येथे कमाल दर ९ हजार रुपये इतका मिळाला.

आवक किती होती?

सर्वाधिक आवक अमरावती (३८,८८ क्विंटल), लातूर (२,०६१ क्विंटल), वर्धा (१,८०० क्विंटल), मलकापूर (३,३७० क्विंटल) या बाजार समित्यांमध्ये झाली.

अनेक ठिकाणी गज्जर, लाल, पांढरी आणि लोकल जातीची तूर विक्रीस आली होती.

लाल तुरीची सर्वाधिक मागणी असून, अनेक बाजारांमध्ये सरासरी दर ६ हजार २०० ते ६ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान होते.

सांगली येथे लोकल तुरीला ८ हजार ५०० रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाल्याने ती सर्वाधिक दर मिळवणारी ठरली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/08/2025
लासलगाव - निफाड---क्विंटल1567656765676
राहूरी -वांबोरी---क्विंटल13641164116411
पैठण---क्विंटल7638563856385
कारंजा---क्विंटल1300579565806325
मानोरा---क्विंटल184609864506275
मोर्शी---क्विंटल703600063506175
हिंगोलीगज्जरक्विंटल180587563756125
मुरुमगज्जरक्विंटल371615164516309
सोलापूरलालक्विंटल9615061506150
लातूरलालक्विंटल2061640067006600
अकोलालालक्विंटल1417600065156400
अमरावतीलालक्विंटल3888620064706335
यवतमाळलालक्विंटल216600064056202
मालेगावलालक्विंटल20440057005604
चिखलीलालक्विंटल30560064006000
नागपूरलालक्विंटल692600064126300
हिंगणघाटलालक्विंटल1993570066666200
वाशीमलालक्विंटल1800580065706200
मुर्तीजापूरलालक्विंटल410583064706150
मलकापूरलालक्विंटल3370590066306400
वणीलालक्विंटल130595063256100
शिरपूरलालक्विंटल3450157015600
तेल्हारालालक्विंटल145601064756410
चांदूर बझारलालक्विंटल356550064806320
मेहकरलालक्विंटल110530062906100
निलंगालालक्विंटल25620064006300
औराद शहाजानीलालक्विंटल37617663486262
सेनगावलालक्विंटल57610064006300
सिंदी(सेलू)लालक्विंटल106585064506300
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल13600561806025
आर्णीलालक्विंटल420600064006150
दुधणीलालक्विंटल733550067006060
सांगलीलोकलक्विंटल50800090008500
उमरेडलोकलक्विंटल6550057255600
वर्धालोकलक्विंटल51627564056300
काटोललोकलक्विंटल230615062936200
जालनापांढराक्विंटल690540067506600
माजलगावपांढराक्विंटल261600066016500
जामखेडपांढराक्विंटल4610063006200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल5600065006500
करमाळापांढराक्विंटल21645065506450
गेवराईपांढराक्विंटल12580064506375
परतूरपांढराक्विंटल8590063606000
गंगापूरपांढराक्विंटल1510054005200
औराद शहाजानीपांढराक्विंटल32620166956448

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात तेजी; लाल जातीला मिळतोय झकास दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डतूर