Join us

Tur bajar bhav : तुरीच्या दरात हालचाल; कोणत्या बाजारात दर सर्वाधिक? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:38 IST

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (५ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी घट होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ७ हजार ९४७ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १५९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (५ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत मोठी घट होताना दिसली. एकूण ७ हजार ९४७ क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली आहे. मागील दिवसांच्या तुलनेत या आकडेवारीत लक्षणीय घट होताना दिसली. आवक कमी असली तरी तुरीचे सर्वसाधारण दर ६ हजार १५९ रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळाले आहेत.

तुरीच्या आवकेत घट

तुरीची आवक दररोज सरासरी १० ते १५ हजार क्विंटल इतकी होत होती. मात्र आज, केवळ ७ हजार ९४७ क्विंटल इतकीच आवक झाली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये ही आवक काही क्विंटलांवर येऊन ठेपली असून, त्यामुळे दरांमध्ये चढ-उतार दिसून आले.

सर्वसाधारण दर ६१५९ रुपये प्रति क्विंटल

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर किमान ४ हजार ६०० रुपये ते कमाल ६ हजार ९९० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले. काही बाजारात दरांमध्ये वाढ झाली असली तरी एकूण सरासरी दर ६ हजार १५९ रुपये इतका नोंदविला गेला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/07/2025
पैठण---क्विंटल6460063916300
हिंगोलीगज्जरक्विंटल200590064706185
मुरुमगज्जरक्विंटल269637065486434
सोलापूरलालक्विंटल3580058005800
अकोलालालक्विंटल1460600069906700
अमरावतीलालक्विंटल2391640065816490
मालेगावलालक्विंटल11171159003999
चिखलीलालक्विंटल40555064125950
नागपूरलालक्विंटल947630067616646
मुर्तीजापूरलालक्विंटल240633065506440
मलकापूरलालक्विंटल1195580067556550
सावनेरलालक्विंटल321590064956350
गंगाखेडलालक्विंटल9600061006000
उमरगालालक्विंटल2590163006100
भंडारालालक्विंटल2600060006000
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल5620062506225
दुधणीलालक्विंटल697550067756284
उमरेडलोकलक्विंटल17550062005950
माजलगावपांढराक्विंटल95600065716475
जामखेडपांढराक्विंटल6600065006250
गेवराईपांढराक्विंटल16655066006575
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल14595164486250
देउळगाव राजापांढराक्विंटल1570057005700

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : बाजारात तुरीची आवक घटली पण दर टिकले; हिंगणघाटात तुरीला सर्वाधिक भाव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराबाजारतूरमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती