Join us

Tur Bajar Bhav : तूर बाजारात आवक वाढली; सरासरी भाव 'इतक्या' रुपयांवर स्थिरावला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:03 IST

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मंगळवारी (९ सप्टेंबर) रोजी १२ हजार ३२ क्विंटल तुरीची आवक (Tur Arrivals) झाली. आवक वाढल्याने तुरीचा सरासरी दर ६ हजार १५ रुपये प्रति क्विंटल इतका राहिला. (Tur Bajar Bhav)

राज्यातील बाजारपेठांमध्ये तुरीची आवक (Tur Arrivals) वाढून १२ हजार ३२ क्विंटल इतकी झाली. लाल, गज्जर आणि पांढऱ्या जातीला चांगली मागणी दिसून आली असून, जालना बाजारात पांढऱ्या तुरीस सर्वाधिक ६ हजार ६४० रुपयांचा दर मिळाला.

असे मिळाले दर 

अमरावती बाजारात सर्वाधिक ३ हजार ८०७ क्विंटल तुरीची आवक झाली. येथे लाल जातीला ६ हजार ५० ते ६ हजार ४०० दरम्यान भाव मिळाला व सरासरी दर ६ हजार २२५ रुपये राहिला.

कारंजा बाजारात २ हजार ५२५ क्विंटलची आवक झाली. तूर ५ हजार ६०० ते ६ हजार ४२५ रुपयांत विकली गेली, तर सरासरी दर ६ हजार २१५ रुपये होता.

रिसोड बाजारात ४६० क्विंटल तुरीस ५ हजार ६२० ते ६ हजार २५० दरम्यान भाव मिळाला.

मानोरा, बाभुळगाव, नागपूर, मलकापूर आदी बाजारातही चांगली आवक झाली असून दर ६ हजाराच्या पुढे टिकले.

गज्जर जातीला मागणी 

हिंगोलीत गज्जर तुरीला ५ हजार ६०० ते ६ हजार १४० रुपये दरम्यान भाव मिळाला.

मुरुम बाजारात गज्जर जातीस सर्वाधिक दर नोंदला गेला. येथे तुरीला ६ हजार ३३० ते ६ हजार ३९० दरम्यान भाव मिळत सरासरी दर ६ हजार ३५३ रुपये झाला.

लाल जातीचे वर्चस्व 

राज्यातील बहुतांश बाजारपेठेत लाल तुरीचीच आवक सर्वाधिक झाली.

नागपूर, वर्धा, यवतमाळ, वणी, सावनेर, जालना, चिखली, मेहकर इत्यादी ठिकाणी लाल तुरीचे दर ५ हजार १०० ते ६ हजार ४६५ रुपयांच्या दरम्यान राहिले.

पांढऱ्या जातीला जास्तीचा दर 

जालना बाजारात पांढऱ्या तुरीस सर्वाधिक ६ हजार ६४० रुपये दर नोंदवला गेला.

देउळगाव राजात पांढऱ्या तुरीस सरासरी ५ हजार ८०० रुपये भाव मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/09/2025
दोंडाईचा---क्विंटल1500055555000
पैठण---क्विंटल16580162216200
भोकर---क्विंटल14590060005950
कारंजा---क्विंटल2525560064256215
रिसोड---क्विंटल460562062505950
मानोरा---क्विंटल428580061916040
हिंगोलीगज्जरक्विंटल250560061405870
मुरुमगज्जरक्विंटल171633063906353
अमरावतीलालक्विंटल3807605064006225
यवतमाळलालक्विंटल335600063956197
चिखलीलालक्विंटल63510061255600
नागपूरलालक्विंटल512600064226317
मलकापूरलालक्विंटल1160600064656190
वणीलालक्विंटल78590062006100
सावनेरलालक्विंटल267595962266100
परतूरलालक्विंटल6585061006000
मेहकरलालक्विंटल370520060555700
सेनगावलालक्विंटल43560060005800
मंगरुळपीरलालक्विंटल404550061805850
नेर परसोपंतलालक्विंटल82589561256048
बाभुळगावलालक्विंटल450590162356201
वर्धालोकलक्विंटल52597061706050
काटोललोकलक्विंटल18607061406100
जालनापांढराक्विंटल518530066406525
देउळगाव राजापांढराक्विंटल2510058005800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारात आवकेत घट; पैठण-देवणी बाजारात दर स्थिर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती