Join us

Tomato Market : टोमॅटो बाजारभावात 06 टक्क्यांनी वाढ, मागील आठवड्यातील बाजारभाव कसे होते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:07 IST

Tomato Market : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर टिकून (Tomato Bajarbhav) आहेत. मागील आठवड्यात..

Tomato Market : टोमॅटोच्या बाजारातील सप्ताहातील मागील सरासरी किंमती १७१० रुपये प्रति क्विंटल (Tomato Market Update) होत्या. किंमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पिंपळगाव बाजारात (Pimpalgaon Tomato Market) मागील आठवड्यात टोमॅटो कॅरेटला सरासरी ४६० रुपयांपासून ते ५१० रुपयांपर्यंत दर मिळतो. तर आवकेत रोजच चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. 

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर टिकून (Tomato Bajarbhav) आहेत. टोमॅटो च्या प्रती कॅरेटला ४५० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. मागील आठवड्यातील बाजारभावाचा विचार करता बाजारभावात ०६ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आलं. 

देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये ३३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. यात १० नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात आवक वाढण्यास सुरुवात झाली, मात्र १७ नोव्हेंबर नंतर आवक कमी होत गेल्याचे दिसून येत आहे. 

प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किंमती २१०० रुपये प्रतिक्विंटल होत्या. तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमती १४२० रुपये प्रति क्विंटल होत्या. तर पुणे बाजारात प्रतिक्विंटल १७१० रुपये, नारायणगाव बाजारात ०२ हजार रुपये, संगमनेर बाजारात १५७५ रुपये असा दर मिळाला.

हेही वाचा : Bajari Bajar Bhav : आली थंडी, बाजरीच्या मागणीत व दरातही झाली वाढ

टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती