Join us

Tomato Market : टोमॅटोचे दर घसरण्याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:56 IST

Tomato Market : तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हाच दर सरासरी ३८०० रुपयांपर्यंत मिळत होता. मागील दोन ते तीन आठवड्यातच दरात कमालीची घसरण झाली आहे.

Tomato Market : टोमॅटोच्या दरात (Tomato Market) सातत्याने घसरण सुरूच आहे. मागील आठवड्यातील बाजार भाव पाहिले असता सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हाच दर सरासरी ३८०० रुपयांपर्यंत मिळत होता. मागील दोन ते तीन आठवड्यातच दरात कमालीची घसरण झाली आहे. आता आवक जवळपास ३० टक्क्यांनी वाढली आहे. 

टोमॅटोच्या पुणे बाजारातील (Pune Tomato Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु.१३०७ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत ३० टक्केनी घट झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये ३० टक्केनी वाढ झाली आहे. जून पासून टोमॅटोची आवक राज्यात 55 ते 75 टन इतकी होती. मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ही आवक जवळपास 90 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे दरात घसरण झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किंमती (रु.२२४८० रुपये क्विंटल.) होत्या तर सोलापूर बाजारात कमी किंमती (रु. ८६६ रुपये प्रतिक्विंटल.) होत्या. यात पुणे बाजारात १३०७ रुपये मुंबई बाजारात २४८० रुपये नारायणगाव बाजारात ११४३ रुपये संगमनेर बाजारात ९४७ रुपये असा दर मागील आठवड्यात मिळाला आहे.

आजचे बाजारभाव काय? 

आज लोकल टोमॅटोला अमरावती यांनी फळ भाजीपाला मार्केटमध्ये ११०० रुपये, पुणे बाजारात १३०० रुपये तर मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला २२२० रुपये, इस्लामपूर बाजारात १२५० रुपये, वैशाली टोमॅटोला सोलापूर आणि भुसावळ बाजारात १२०० रुपये कराड बाजारात ०२ हजार रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण टोमॅटोला कोल्हापूर बाजारात १००० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात ६५० रुपये, सातारा बाजारात ०२ हजार रुपये दर मिळाला.

टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती