Join us

Tomato Market : आठवडाभरात टोमॅटो दरात 46 टक्क्यांची घट, कसे होते बाजारभाव? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:13 IST

Tomato Market : टोमॅटोचा बाजार भाव पाहिला असता मागील दोन आठवडे टोमॅटोचे बाजार भाव समाधानकारक होते.

Tomato Market : टोमॅटोचा बाजार भाव पाहिला असता मागील दोन आठवडे टोमॅटोचे बाजार भाव (Tomato Market) समाधानकारक होते. मात्र टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावात घसरण सुरु झाली आहे. मागील आठवड्यात 28 जुलै रोजी जवळपास 2800 रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र 4 ऑगस्ट रोजीच्या बाजारभावानुसार 1908 रुपये क्विंटलपर्यंत दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

टोमॅटोच्या पुणे बाजारातील (Pune market) मागील सप्ताहातील सरासरी किंमत 198 रुपये प्रतिक्विंटल होती मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीत जवळपास 46 टक्क्यांनी घट झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारी पाहिली तर जून महिन्यात देशभरात 60 टनांपर्यंत आवक होती. तर जून महिन्यात महाराष्ट्रातील आवक 58 टक्क्यांपर्यंत होती. तर जुलै महिन्यात देशभरात 82 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात देखील 80 टक्क्यां पर्यंत टोमॅटो आवकेत वाढ झाल्याचे चित्र आहे.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी मुंबई बाजारात सर्वाधिक 3220 रुपये क्विंटल किंमत मिळाली तर सोलापूर बाजारात कमीत कमी 1415 रुपये क्विंटल दर मिळाला. काही निवडक बाजारातील सरासरी किमती पाहिल्या असता पुणे बाजारात 1908 रुपये, मुंबई बाजारात 3220 रुपये, नारायणगाव बाजारात 02 हजार रुपये, संगमनेर बाजारात 1800 रुपये, तर सोलापूर बाजार 1415 दर मिळतो आहे. एकूणच मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचं निदर्शनास आले आहे.

आजचे टोमॅटो दर पाहुयात...कोल्हापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल १२०० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात ३ हजार रुपये, कल्याण बाजारात १७५० रुपये, पुणे बाजारात १५०० रुपये, नागपूर बाजारात ३३५० रुपये, मुंबई बाजारात २७०० रुपये, सोलापूर बाजारात १४०० रुपये दर मिळाला. 

(स्रोत : कृषी विभाग स्मार्ट प्रकल्प, बाजार विश्लेषण अहवाल)

टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती