Tomato Bajar Bhav : महिनाभरापूर्वी ८० ते १०० रुपये किलो गाठणारा टोमॅटो आता पुन्हा स्वस्त झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत भाव कोसळून ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पावसाचा फटका, अचानक वाढलेली आवक आणि मागणी घटल्याने दरात मोठी चढ-उतार दिसत आहेत. (Tomato Bajar Bhav)
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे टोमॅटो पीक पुन्हा एकदा तोट्यात जात असल्याचे चित्र आहे.(Tomato Bajar Bhav)
मागणी-पुरवठ्याचे गणित
टोमॅटो हा नाशवंत माल असल्यामुळे त्याचे भाव नेहमीच मागणी-पुरवठ्याच्या संतुलनावर ठरतात.
बाजारात मोठ्या प्रमाणात माल आल्यास दर कोसळतात.
माल कमी झाला की भाव झपाट्याने वाढतात.
या खेळात दलालांचा फायदा होतो, मात्र शेतकऱ्यांच्या हातात नेहमीच तोटा पडतो.
जाधववाडीतील स्थिती
जाधववाडी बाजारात दररोज १५ ते २० टन टोमॅटोची आवक होत आहे.
पावसामुळे माल खराब झाला.
लग्नसराई संपल्याने मागणी कमी झाली.
परिणामी बाजारात पुरवठा वाढून दर घसरले.
दरस्थिती (घाऊक व किरकोळ)
घाऊक बाजार : १ हजार ते १ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल
किरकोळ बाजार : २५ ते ३० रुपये प्रतिकिलो
शेतकऱ्यांच्या हातात : ३ किलोमागे केवळ १० रुपये
शेतकऱ्यांच्या अडचणी
* टोमॅटो पिकात नियोजनाचा अभाव हे दर कोसळण्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.
* बहुतांश शेतकरी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर लागवड करतात.
* अचानक आवक वाढल्याने भाव पाडतात.
* दर स्थिर राहण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड गरजेची आहे.
प्रक्रिया उद्योगाची गरज
टोमॅटो प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. दरातील चढ-उतार कमी करण्यासाठी नियोजित लागवड महत्त्वाची आहे.- अजय माळी, व्यापारी
टोमॅटोचे भाव कधी शंभर तर कधी ३० रुपयांवर घसरत असल्याने शेतकऱ्यांना दरबदलांचा मोठा फटका बसत आहे. सरकारकडून प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, थंड साठवणूक सुविधा आणि टप्प्याटप्प्याने लागवडीचे मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळू शकतो.