Join us

Tomato Bajar Bhav : टोमॅटोला सोन्याचा भाव; देवगाव रंगारीत मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:37 IST

Tomato Bajar Bhav : देवगाव रंगारीत सोमवारी सुरू झालेल्या टोमॅटो लिलावाने शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३०६ रुपये किलोचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. एकाच दिवसात लाखोंची कमाई करणारे शेतकरी या हंगामात नव्या उमेदीने शेतीत उतरणार आहेत. (Tomato Bajar Bhav)

Tomato Bajar Bhav : देवगाव रंगारीत सोमवारी सुरू झालेल्या टोमॅटो लिलावाने शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३०६ रुपये किलोचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. (Tomato Bajar Bhav)

एकाच दिवसात लाखोंची कमाई करणारे शेतकरी या हंगामात नव्या उमेदीने शेतीत उतरणार आहेत.  देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत सोमवारी टोमॅटो खरेदी-विक्री लिलावाला प्रारंभ झाला. (Tomato Bajar Bhav)

पहिल्याच दिवशी तब्बल ५ हजार ६७८ कॅरेट (१ कॅरेट = २० किलो) टोमॅटोची आवक झाली.(Tomato Bajar Bhav)

सर्वोच्च दराचा मान ताडपिंपळगाव येथील शेतकरी सादिक उस्मान शेख यांच्या 'शाहू' वाणाच्या टोमॅटोला मिळाला. त्यांना तब्बल ३०६ रुपये प्रति किलो दराने विक्रीचा लाभ झाला. शेख यांनी १८ कॅरेट टोमॅटो विक्री करून एकूण ८२ हजार ५३० इतका महसूल मिळवला.(Tomato Bajar Bhav)

याच लिलावात देवगाव रंगारी येथील संतोष हिवाळे यांना २०१ रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यांनी ११ कॅरेट टोमॅटो विक्री केली. उर्वरित दिवसभरात सरासरी ५४ रुपये प्रति किलो दर नोंदवला गेला.(Tomato Bajar Bhav)

येत्या काळात १९ हजार कॅरेटपर्यंत आवक बाजारात दररोज होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Tomato Bajar Bhav)

टोमॅटो लिलाव – पहिल्या दिवसाचे दर

शेतकरीगाववाणप्रमाणदर (₹/किलो)एकूण रक्कम
सादिक उस्मान शेखताडपिंपळगावशाहू१८ कॅरेट३०६₹८२,५३०
संतोष हिवाळेदेवगाव रंगारी११ कॅरेट२०१
इतरसरासरी ५४

शेतकऱ्यांना फायदा कसा?

मागील वर्षापासून ठरल्याप्रमाणे व्यापारी आता शेतात न येता थेट देवगाव रंगारी बाजारातच खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेच्या मालाला चांगला भाव मिळतो आणि पारदर्शक व्यवहार होतो.

पुढील आवक अपेक्षा

कन्नड, अंधानेर, बहिरगाव, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, लासुर स्टेशन, वैजापूर आदी भागांतून रोज सरासरी १९ हजार ६७ कॅरेट टोमॅटोची आवक होण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

सर्व शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपला कृषीमाल देवगाव रंगारी उपबाजारातच विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती डॉ. मनोज राठोड व संचालक मंडळाने केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tomato Market : टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रटोमॅटोबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती