Join us

Soyabean Bajarbhav : केवळ तासगाव बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 18:09 IST

Soyabean Market : आज केवळ एका बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाल्याचे दिसून आले. वाचा सविस्तर

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) 14310 क्विंटल आवक झाली. यात सर्वसाधारण सोयाबीनची 4500 तर पिवळ्या सोयाबीनची 08 हजार क्विंटलहुन अधिक आवक झाली. आज सोयाबीनला (Soyabean Bajarbhav) सरासरी 4 हजार 53 रुपयांपासून  ते 4 हजार 400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 05 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Soyabean Market) सरासरी 04 हजार 50 रुपयांपासून 04 हजार 400 रुपयेपर्यंत सरासरी दर मिळाला. तर बार्शी बाजार समिती सरासरी दर मिळाला. आज कारंजा बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक 3000 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत 04 हजार 375 रुपयांचा दर मिळाला. 

आज अमरावती बाजार समितीत (Amaravti bajar samiti) लोकल सोयाबीनला 04 हजार 364 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 336 रुपये, तर मेहकर बाजारात 04 हजार 300 रुपयांचा दर मिळाला. तसेच लासलगाव निफाड बाजार समितीत आलेल्या पांढऱ्या सोयाबीनला 04 हजार 425 रुपयांचा दर मिळाला. आज पिवळ्या सोयाबीनला अकोला बाजार समिती 4250 रुपये, यवतमाळ बाजारात 04 हजार 287 रुपये, मलकापूर बाजारात 04 हजार 305 रुपये, तर आज सर्वाधिक 4 हजार 760 रुपयांचा दर तासगाव बाजार समितीत मिळाला आहे.

असे आहेत सोयाबीनचे बाजारभाव

टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती