Join us

भाजीपाला पिकाला काय बाजारभाव मिळतोय? आजचे भाजीपाला जाणून घ्या? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 17:03 IST

आज कुठल्या बाजार समितीत कोणत्या भाजीला चांगला भाव मिळाला, हे सविस्तर जाणून घेऊयात..

आजच्या बाजार अहवालानुसार भाजीपाल्याचे दर पाहता अकोला बाजार समितीत बटाटा प्रति क्विंटलला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत भेंडीला प्रति क्विंटलला कमीत कमी 5000 तर सरासरी 6000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत फ्लॉवरचे 8 हजार 448 नगांची आवक झाली. यावेळी या बाजार समितीत कमीत कमी 480 रुपये तर सरासरी 720 रुपये दर मिळाला. 

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत गवारला प्रतिक्विंटल कमीत कमी चार हजार रुपये तर सरासरी 6 हजार रुपये बाजार भाव मिळाला. अकलुज बाजार समितीत काकडीला प्रति क्विंटल मागे कमीत कमी 1 हजार रुपये तर सरासरी 1500 रुपये बाजार भाव मिळाला. कोल्हापूर बाजार समितीत कोबीला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1500 रुपये बाजारभाव मिळाला.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…