Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात द्राक्ष आणि टोमॅटोचा बाजारभाव कसा, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:49 IST

द्राक्ष आणि टोमॅटो शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे शेतकरी चिंतेत असून आजचे दर पाहुयात!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असताना दुसरीकडे टोमॅटो आणि द्राक्ष उत्पादक देखील हैराण आहेत. द्राक्ष आणि टोमॅटो शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे शेतकरी चिंतेत आहे. आजच्या दर अहवालानुसार द्राक्षाला प्रति क्विंटलमागे सरासरी  हजार रुपयांचा भाव मिळाला तर टोमॅटो प्रति क्विंटल मागे सरासरी आठशे रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत  बाजारभाव मिळाला आहे.

असे आहेत द्राक्ष बाजारभाव 

आज 23 फेब्रुवारीच्या दर अहवालानुसार सोलापूर बाजार समितीत वैशाली जातीच्या टोमॅटोला कमीत कमीत 200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर सरासरी 800 रुपये मिळाला. पुणे बाजार समितीत लोकल टोमॅटो प्रति क्विंटलला कमीत कमीत 1000 तर सरासरी 1500 भाव मिळाला. नागपूर बाजार समितीत प्रति क्विटंलला 1200 रुपये बाजारभाव मिळाला. तर सरासरी 1625 बाजारभाव मिळाला. तर मुंबई बाजार समितीत नं. १ टोमॅटोला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1500 बाजारभाव मिळाला. जळगाव बाजार समितीमध्ये वैशाली जातीच्या टोमॅटोला प्रती क्विंटलला कमीत कमी 900 रुपये बाजार मिळाला. तर सरासरी 1100 रुपये बाजारभाव मिळाला. पंढरपूर बाजार समितीत हायब्रिड जातीच्या टोमॅटो प्रती क्विंटलला सरासरी 1200 रुपये बाजारभाव मिळाला.   त्यानुसार दोन दिवसांच्या तुलेनत आज टोमॅटोच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळाली. 

असे आहेत द्राक्ष बाजारभाव नाशिक बाजार समितीत द्राक्षाची 34 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमीत 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर सरासरी 3000 रुपये मिळाला. जळगाव बाजार समितीत द्राक्षाला प्रति क्विंटलला कमीत कमीत 2500 तर सरासरी 3000 व मिळाला. पुणे बाजार समितीत प्रति क्विटंलला 2000   रुपये बाजारभाव मिळाला. तर सरासरी 7000 बाजारभाव मिळाला. त्यानुसार पुणे बाजार समितीत सर्वाधिक भाव मिळाला. मागील दोन दिवसांच्या बाजार भावांचा आढावा घेतला असता द्राक्ष बाजारभावातही कमी अधिक प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डद्राक्षेटोमॅटो