Join us
Daily Top 2Weekly Top 5

Til Market Update : तिळाच्या दरात उसळी; अकोल्यात फक्त 'इतके' क्विंटल आवक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:37 IST

Til Market Update : अकोला बाजार समितीत तिळाच्या आवकेत मोठी घट नोंदवली गेली असून, केवळ १२ क्विंटल आवक (Till Awak) झाल्याने दरात उसळी दिसून आली आहे. उत्पादन कमी असल्याने व्यापाऱ्यांची मागणी वाढली असून तिळाचा कमाल भाव प्रतिक्विंटल १० हजार २२५ रुपयांवर पोहोचला आहे. (Til Market Update)

Til Market Update  : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी तिळाची आवक (Till Awak) अत्यंत कमी नोंदवली गेली. केवळ १२ क्विंटल तिळाची आवक झाल्याने बाजारात तिळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. (Til Market Update)

तिळाला प्रतिक्विंटल कमाल १० हजार २२५ रु., सरासरी ९ हजार ८१२ रु. , तर किमान ९ हजार ४०० रु. असा चांगला दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. (Til Market Update)

यंदा तिळाचे उत्पादन पावसाचा अनियमित पॅटर्न, उशिरा झालेली पेरणी आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक सातत्याने कमी होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून दरात वाढ दिसून येत आहे. (Til Market Update)

कमी उपलब्धता आणि व्यापाऱ्यांची मागणी कायम असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यवसायिकांनी वर्तविली आहे.(Til Market Update)

सोयाबीन सीडसची आवक १३६ क्विंटल 

सोयाबीनला सरासरी ५ हजार ४२ रु., कमाल ५ हजार ५० रु. , तर किमान ५ हजार रु. प्रति क्विंटल दर मिळाला. सोयाबीनच्या भावात दिवसेंदिवस चढ - उतार दिसत असले तरी बाजारातील आवक स्थिर असल्याचे बाजार समितीने सांगितले.

कमी आवक, वाढती मागणी आणि कमी उत्पादन या त्रिसूत्रीमुळे तिळाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Til Market Update: तीळ उत्पादनावर पावसाची 'संक्रांत'; दरवाढीची शक्यता पुन्हा वाढली!

English
हिंदी सारांश
Web Title : Sesame Prices Soar in Akola Due to Low Supply

Web Summary : Akola market sees sesame price surge due to minimal supply (12 quintals). Irregular rains and pest issues reduced production. Prices hit ₹10,225/quintal. Soybean arrival was 136 quintals. Further price increases are expected.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती