Soybean Tur Market : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीन व तूर या दोन शेतमालांचे दर संमिश्र स्वरूपाचे दिसून आले. काही बाजारांत आवक मर्यादित राहिल्याने दरांना आधार मिळाला, तर दर्जेदार मालाला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.(Soybean Tur Market)
सोयाबीन बाजारभाव
सोयाबीनची एकूण आवक मर्यादित राहिली. सिल्लोड, बुलढाणा आणि देवणी या बाजारांत आवक दिसून आली.
सिल्लोड बाजार समितीत केवळ २६ क्विंटल आवक नोंदली गेली. येथे सोयाबीनला किमान ४ हजार ५५० ते कमाल ४ हजार ८५० रुपये, तर सरासरी ४ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
बुलढाणा बाजारात सर्वाधिक ३०० क्विंटल आवक झाली. येथे दर ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपये, सरासरी ४ हजार ६५० रुपये राहिले.
देवणी बाजारात आवक १२५ क्विंटल असून, दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक दर मिळाले. येथे दर ४ हजार ८९६ ते ५ हजार १२० रुपये, सरासरी ५ हजार ८ रुपये प्रति क्विंटल नोंदविण्यात आले.
तूर बाजारभाव
तुरीची मागणी मजबूत असून काही बाजारांत दर उच्च पातळीवर राहिले.
पैठण बाजारात ८४ क्विंटल आवक झाली. येथे दर ६ हजार ते ६ हजार ७५१ रुपये, सरासरी ६ हजार ५७१ रुपये राहिले.
सिल्लोड बाजारात ३५ क्विंटल आवक असून दर ६ हजार २०० ते ६ हजार ८०० रुपये, सरासरी ६ हजार ७०० रुपये मिळाले.
देवणी बाजारात ४६ क्विंटल आवक झाली. येथे तुरीला राज्यातील सर्वाधिक दर मिळाले. दर ७ हजार १०१ ते ७ हजार ३५१ रुपये, तर सरासरी ७ हजार २२६ रुपये प्रति क्विंटल राहिले.
बुलढाणा बाजारात १२० क्विंटल आवक असून दर ६ हजार ते ६ हजार ८०० रुपये, सरासरी ६ हजार ४०० रुपये नोंदले गेले.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनला कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर? वाचा सविस्तर
Web Summary : Soybean and tur prices varied across Maharashtra markets. Devani saw top rates: soybean at ₹5,120/quintal, tur at ₹7,351/quintal. Limited supply supported prices in some areas.
Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन और तुअर की कीमतों में भिन्नता रही। देवणी में उच्चतम दरें देखी गईं: सोयाबीन ₹5,120/क्विंटल, तुअर ₹7,351/क्विंटल। कुछ क्षेत्रों में सीमित आपूर्ति ने कीमतों को समर्थन दिया।