Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soyabean Market : सोयाबीनच्या दराने घेतली उसळी, 'या' मार्केटमध्ये मिळाला आतापर्यंतचा उच्चांकी दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:45 IST

Soyabean Market : तेलासह सोयापेंडच्या दरात झालेली मोठी वाढ, यामुळे स्थानिक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने उसळी घेतली आहे.

अमरावती : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि तेलासह सोयापेंडच्या दरात झालेली मोठी वाढ, यामुळे स्थानिक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने उसळी घेतली आहे.

शनिवारी येथील बाजार समितीत सोयाबीनला आतापर्यंतचा उच्चांकी दर मिळाला असून, अधिकतम ६,३६५ रुपये प्रति क्विंटलने व्यवहार झाले. चालू हंगामातील ५,३२८ रुपये हमीभावाच्या तुलनेत हा दर तब्बल एक हजार रुपयांहून अधिक आहे.

काही दिवसांपासून सोयाबीनच्या आवकमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यातच जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पशुखाद्य म्हणून सर्वाधिक सोयापेंडला असलेली मोठी मागणी, यामुळे सोयाबीनचे दर तेजीत आहेत. शनिवारी बाजार समिती उघडताच सोयाबीनच्या भावात सकारात्मक कल दिसून आला. 

अंतिम सत्रात हा दर ६ हजार ३६५ रुपयांवर स्थिरावला. पोल्ट्री उद्योगाकडून सोयापेंडला मोठी मागणी असल्याने प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीनची खरेदी वाढविली आहे. आगामी उत्पादनाविषयी जागतिक बाजारपेठ अनिश्चितता आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाएकीकडे सोयाबीनचे दरवाढ होत असताना, दुसरीकडे सामान्य शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी माल शिल्लक नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच कमी दरात सोयाबीन विकले. आता दर ६,३०० रुपयांच्या पार गेले आहेत, तेव्हा केवळ सधन शेतकरी वा व्यापाऱ्यांकडेच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दरवाढीचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला झालेला नाही.

देशांतर्गत सोयातेलाचे दरात सुधार आणि सोयापेंडची दरवाढ झाल्याने स्थानिक बाजारात ही तेजी दिसून येत आहे. आवक कमी असल्याने पुढील काही दिवस बाजारभाव स्थिर किंवा अंशतः वाढण्याची शक्यता आहे.- संजय जाजू, व्यापारी 

वाचा सोयाबीन मार्केट  

02/05/2026
अहिल्यानगर---क्विंटल36530060005600
अहिल्यानगरलोकलक्विंटल270580163636211
अहिल्यानगरपिवळाक्विंटल5540057005550
अकोलापिवळाक्विंटल1709586561556075
अमरावतीलोकलक्विंटल2280580063656082
बीड---क्विंटल829400064016200
बीडपिवळाक्विंटल653560062256100
बुलढाणापिवळाक्विंटल3694540867136197
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2580558455820
छत्रपती संभाजीनगरपिवळाक्विंटल1550055005500
धाराशिव---क्विंटल104520052005200
हिंगोलीलोकलक्विंटल550550062005850
हिंगोलीपिवळाक्विंटल170565058505725
जालनापिवळाक्विंटल1889515063505875
लातूरपिवळाक्विंटल1747577063016054
नागपूरपिवळाक्विंटल498540064605930
नागपूरपांढराक्विंटल269530060005825
नाशिक---क्विंटल51597562596025
नाशिकलोकलक्विंटल10594259425942
नाशिकपिवळाक्विंटल3550060126012
नाशिकपांढराक्विंटल186480063126261
परभणीपिवळाक्विंटल83616061996175
वर्धापिवळाक्विंटल1882425056585337
वाशिम---क्विंटल3200582564606140
वाशिमपिवळाक्विंटल600600063006250
यवतमाळपिवळाक्विंटल310500053005200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)21031
English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Surge: Record High Rates in Amravati Market

Web Summary : Soybean prices soared due to international factors and increased oilseed demand. Amravati market saw a record high of ₹6,365/quintal. While prices rise, most farmers already sold their stock, benefiting traders more than farmers.
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती