Join us

Soybean Market Update : बाजारातील तेजीने सोयाबीनचे समीकरण बदलणार का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:48 IST

Soybean Market Update : खरीप (Kharif) हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे बाजार समितीतही शेतमालाची आवक वाढली आहे. वाचा सविस्तर (Soybean Market Update)

Soybean Market Update : खरीप (Kharif) हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे बाजार समितीतही शेतमालाची आवक वाढली आहे. (Soybean Market Update)

रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. बीज योग्य दर्जाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ९०० ते ५ हजार २५० रुपये, तर सामान्य सोयाबीनला ४ हजार १५० ते ४ हजार ३०० रुपये दर मिळाला. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.(Soybean Market Update) सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे बी-बियाणे, खते तसेच इतर शेतीसंबंधित गरजांसाठी शेतकऱ्यांना भांडवलाची निकड भासत आहे. (Soybean Market Update)

अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही मागील हंगामातील मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असून, मागील काही महिन्यांपासून बाजारातील दरातील अनिश्चिततेमुळे त्यांनी विक्रीपासून संयम बाळगला होता. (Soybean Market Update)

सध्या दरात थोडी सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर विक्रीचा निर्णय घेतला असून, त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. ३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली. 

मानोरा बाजारसमितीत आवक घटली! 

मानोरा  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ २५० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार १५० ते ४ हजार ४०० रुपये, असा दर मिळाला. 

कारंजा बाजार समितीत आवक विक्रमी! 

कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ हजार क्विंटलवर सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार २९० ते ४ हजार ३४० रुपये असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात शेतमालाची आवक वाढत आहे. 

शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवलेले आहे. गेल्या काही दिवसांत दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकरी आता बाजार समितीकडे वळताना दिसत आहेत. - विष्णुपंत भुतेकर,  सभापती,  कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड 

खरीप हंगामात बियाणे, खते आदी आवश्यक खरेदीसाठी आर्थिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दराने विक्री करून आर्थिक नुकसान सहन करत शेतकऱ्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. - बबन सानप, शेतकरी 

हे ही वाचा सविस्तर : Dal Market : सरकारच्या डाळींच्या आयात धोरणाचा शेतकऱ्यांवर काय होतोय परिणाम वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्डखरीप