Soybean Market Update : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (७ नोव्हेंबर) सोयाबीनबाजारात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. विशेषतः 'बिजवाई सोयाबीन' च्या दरात तब्बल हजार रुपयांची झेप घेत, दराने नव्या उच्चांकाला गवसणी घातली.(Soybean Market Update)
उच्च प्रतीच्या बिजवाई सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ८हजार ४३० रुपये इतका विक्रमी दर मिळाल्याची नोंद झाली असून, व्यापार्यांमध्ये चढाओढीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Soybean Market Update)
एकाच दिवसात १ हजार रुपयांनी वाढ
केवळ एका दिवसात बिजवाई सोयाबीनच्या दरात तब्बल हजार रुपयांनी वाढ झाली.
६ नोव्हेंबर रोजी या सोयाबीनला ७ हजार ४०१ रुपये प्रती क्विंटल दर मिळाला होता.
तर ७ नोव्हेंबरला तोच दर ८ हजार ४३० रुपये प्रती क्विंटल इतका झाला.
सलग दोन दिवसांत बाजाराने विक्रमी उंची गाठली.
आवक वाढली, पण दर्जेदार मालाला जास्त भाव
वाशिम बाजार समितीत शुक्रवारी एकूण २०,००० क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली. त्यात बिजवाई सोयाबीनचीच सुमारे ५ हजार क्विंटल आवक नोंदवली गेली. अवकाळी पावसाने नुकतेच शेतकऱ्यांना काहीसे नुकसान दिले असले तरी, उच्च दर्जाच्या बिजवाई सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून जोरदार मागणी दिसून आली.
वाशिम बाजार समितीत सलग दोन दिवसांपासून बिजवाई सोयाबीनला विक्रमी दर मिळत आहेत. यंदा प्रथमच या जातीची आवकही मोठ्या प्रमाणात होत असून, यापूर्वी इतका दर कधीच मिळालेला नाही.- सुरेश भोयर, अध्यक्ष, व्यापारी असो., वाशिम बाजार समिती
बिजवाई सोयाबीनचा दर नव्या विक्रमाला गवसला आहे. प्रतिक्विंटल ₹८,४३० इतका दर मिळाला असून, हा कल पुढेही वाढीचा राहील अशी शक्यता आहे.- महादेवराव काकडे, सभापती, बाजार समिती
हमीभावापेक्षा अनेक पटींनी अधिक दर
राज्य शासनाने जाहीर केलेला सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल एवढा असताना, सध्या बाजारातील दर त्यापेक्षा तब्बल तीन हजार रुपयांनी अधिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
सध्या तेलबिया पिकांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढलेली असून, दर्जेदार सोयाबीनचे दर आणखी काही दिवस स्थिर किंवा किंचित वाढीचे राहण्याची शक्यता आहे.
Web Summary : Beed soybean prices hit a record ₹8,430/quintal in Washim market. High demand fuels farmer profits. Prices are expected to rise further, benefiting farmers.
Web Summary : वाशिम बाजार में बीड सोयाबीन की कीमतें ₹8,430/क्विंटल के रिकॉर्ड स्तर पर पहुंच गईं। उच्च मांग से किसानों को लाभ हुआ। कीमतों में और वृद्धि होने की उम्मीद है, जिससे किसानों को फायदा होगा।