जब्बार चीनी
मागील दशकभरात सोयाबीन शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्याने त्यांच्या हातात उत्पन्न कमी पडत आहे. २०१५ मध्ये सोयाबीनचा हमीभाव ३हजार ११५ होता, तर सध्या तो ५ हजार ३२८ पर्यंत पोहोचला आहे. (Soybean Market Update)
पण खासगी बाजारात व्यापारी केवळ ३ हजार ५०० ते ४ हजार या दरानेच खरेदी करत आहेत. दरम्यान, उत्पादनाचा खर्च, खतांचे दर आणि मजुरी दुप्पट वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Soybean Market Update)
सोयाबीनपासून तयार होणाऱ्या तेलाचे भाव मात्र ५० वरून १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, आणि शेतकऱ्यांचा वाटा मात्र तसाच ठप्प आहे. (Soybean Market Update)
सोयाबीनला चांगला हमीभाव मिळावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून शेतकरी लढा देत आहेत. विरोधी बाकावर असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन प्रश्नावर मोर्चा काढला होता, परंतु त्या मागणीला आजही न्याय मिळालेला नाही. (Soybean Market Update)
कारण गेल्या दहा वर्षांत सोयाबीनचे दर जवळपास स्थिरच राहिले असून, शेतीचा खर्च मात्र प्रचंड वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही परत येत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
दहा वर्षांत दरात फक्त २ हजारांची वाढ, पण खर्चात तिप्पट वाढ
२०१५ साली सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ११५ रुपये प्रति क्विंटल होता, तर २०२४-२५ मध्ये हा दर ५ हजार ३२८ रुपये झाला आहे, म्हणजे २ हजार २१३ रुपयांची वाढ दहा वर्षांत झाली.
मात्र, दुसरीकडे बियाणे, खते, मजुरी, कीडनाशके आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने शेतीचा खर्च तीनपटीने वाढला आहे. त्यामुळे हमीभाव वाढला असला तरी शेतकऱ्यांच्या नफ्यात घट झाली आहे.
खासगी बाजारात ३ हजार ५०० ते ४ हजार १०० दरम्यान व्यवहार
सरकारकडून सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये निश्चित केला असला तरी खासगी व्यापारी केवळ ३ हजार १०० ते ४ हजार १०० रुपये दरानेच खरेदी करत आहेत. या दरांमुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपयांचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या या लूटमारविरोधात शेतकरी संतप्त आहेत.
वर्षनिहाय सोयाबीनचा हमीभाव
| वर्ष | हमीभाव (रु./क्विंटल) |
|---|---|
| २०१५-१६ | ३७१३ |
| २०१६-१७ | ३७१३ |
| २०१७-१८ | ३०५० |
| २०१८-१९ | ३१९२ |
| २०१९-२० | ३६८५ |
| २०२०-२१ | ३८६९ |
| २०२१-२२ | ६५५० |
| २०२२-२३ | ४५३५ |
| २०२३-२४ | ४५३५ |
| २०२४-२५ | ५३२८ |
दर आणि महागाई यातील तफावत
२०१४ मध्ये खाद्यतेलाचे दर ५० रुपये प्रति किलो होते; आज तेच दर १५० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. परंतु, त्याच कालावधीत सोयाबीनचा दर फक्त दोन हजार रुपयांनीच वाढला. यामुळे उत्पादन आणि विक्री यातील संतुलन बिघडले असून, शेतकऱ्यांना खरी किंमत मिळत नाही.
वणी तालुक्यात सोयाबीन क्षेत्रात वाढ, पण पिकांचे नुकसान
वणी तालुक्यात सोयाबीनकडे नगदी पिकाच्या स्वरूपात वाढते आकर्षण दिसून येत आहे. कापसाच्या तुलनेत शेतकरी आता सोयाबीनकडे वळत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पिके पडून गेली असून, उत्पादन घटल्याने नुकसान दुप्पट झाले आहे.
शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकले
दरवर्षी उत्पादन वाढले तरी नफा घटतो आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेती सोडून मोलमजुरीकडे वळत आहेत. दहा वर्षांत हमीभावात वाढ असूनही व्यापारी दर पडल्यामुळे आणि खर्च वाढल्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकलेले आहेत.
शेतकऱ्यांना खरी मदत मिळण्यासाठी सरकारने बाजारातील दर नियंत्रित करणे आणि हमीभावावर प्रत्यक्ष खरेदी वाढवणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
Web Summary : Marathwada faced more heavy rain, impacting 1200 villages across five districts. Excessive rainfall, 133% of the average, caused flooding in the region, damaging soybean crops and disrupting normal life. Latur district was severely affected, with overflowing rivers and disrupted connectivity.
Web Summary : मराठवाड़ा में फिर भारी बारिश हुई, जिससे पांच जिलों के 1200 गांव प्रभावित हुए। अत्यधिक वर्षा, औसत का 133%, के कारण क्षेत्र में बाढ़ आ गई, जिससे सोयाबीन की फसलें बर्बाद हो गईं और सामान्य जीवन बाधित हो गया। लातूर जिला बुरी तरह प्रभावित हुआ, नदियाँ उफान पर और कनेक्टिविटी बाधित।