Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Market Update : लातूरमध्ये सोयाबीनचे दर घसरले, पण शेतकऱ्यांची हमीभाववर नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:43 IST

Soybean Market Update : लातूर बाजार समितीत दिवाळीनंतर सोयाबीनची आवक मंदावली असून दरात चढ-उतार सुरू आहेत. मंगळवारी सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ६० ने घसरून ४ हजार ७७१ झाला. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान आणि दर्जा खालावल्याने सध्या बाजारात 'बेभाव' वातावरण दिसत आहे. तरीही शेतकऱ्यांना पुढील दिवसांत दरवाढीची आशा कायम आहे. (Soybean Market Update)

Soybean Market Update : दिवाळीनंतर लातूरबाजार समितीत सोयाबीनची आवक घटली असून, दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. सोमवारी सोयाबीनचा कमाल दर ४ हजार ८३१ रुपये प्रति क्विंटल होता, मात्र मंगळवारी हा दर ६० ने घटून ४ हजार ७७१ रुपये एवढा झाला. मंगळवारी एकूण १९ हजार ४८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.(Soybean Market Update)

आवक घटली, दर अस्थिर

लातूर जिल्ह्यात या खरीप हंगामात ४ लाख ८७ हजार ६६३ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. मात्र अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पाणथळ भागांमुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले. 

काढणीनंतर काहींच्या गंजी वाहून गेल्या, तर साठवणीतही नुकसान झाले. यामुळे बाजारात येणाऱ्या सोयाबीनची गुणवत्ता घसरली असून, खालावलेल्या प्रतींमुळे किमान दरात घट दिसून आली होती. 

सध्या आवक मंदावल्याने किमान दर ४ हजार २७१ रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत.

दर बेभाव, पण आशा कायम

सध्या सोयाबीनच्या बाजारभावात स्थिरता नसली तरी शेतकऱ्यांना आगामी काळात दर वाढीची अपेक्षा आहे. आवक आणखी कमी झाल्यास आणि दर्जेदार सोयाबीन बाजारात आल्यास दर ५ हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद अद्याप मंद आहे. त्यामुळे खरेदी-विक्री बाजारभावांवर अवलंबूनच सुरू आहे.

मूग-उडदात दरात घसरण

सोयाबीनसोबतच मंगळवारी मूग व उडदाची आवक वाढल्याने त्यांच्या दरातही घट झाली.

उडदाचे दर : ६ हजार २०० वरून ६ हजार ०५१ रुपये प्रति क्विंटल

मूगाचे दर : ८ हजार ३०० वरून ८ हजार २७१ रुपये प्रति क्विंटल

सध्या सोयाबीन बेभाव अवस्थेत आहे. 

'पोटली, कडता नावाखाली खरेदी होत असली तरी भावात समाधान नाही. पिकाचे नुकसान आणि दरघसरण यामुळे खरीप हंगाम तोट्यात गेला,' असे स्थानिक उत्पादकांनी सांगितले.

आवक घटली असली तरी दर्जेदार मालाला मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या अपेक्षेनुसार पुढील काही दिवसांत बाजारभावात सुधारणा होऊ शकते. मात्र, स्थिरता येण्यासाठी हवामान आणि खरेदी केंद्रांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : सोयाबीनची विक्रमी आवक; बाजार समित्या फुल्ल वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डलातूर