Join us

Soybean Market Update : बाजारात सोयाबीनची आवक वाढली; पण दर 'जैसे थे'! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:43 IST

Soybean Market Update : शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामासाठी बियाणे, खते व निविष्ठा खरेदीसाठी साठवलेले सोयाबीन बाजारात विक्रीस आणले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दररोजची आवक (Arrivals) १० हजार क्विंटलच्या घरात पोहोचली असली, तरी बाजारभाव मात्र स्थिर आहेत. (Soybean Market Update)

Soybean Market Update : शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामासाठी बियाणे, खते व निविष्ठा खरेदीसाठी साठवलेले सोयाबीनबाजारात विक्रीस आणले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दररोजची आवक  (Arrivals)  १० हजार क्विंटलच्या घरात पोहोचली असली, तरी बाजारभाव मात्र स्थिर आहेत. (Soybean Market Update)

कमाल दर ४ हजार २८० रुपये प्रति क्विंटलवरच स्थिरावले असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. (Soybean Market Update)

वाशिम  जिल्ह्यात खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी गत हंगामात साठवून ठेवलेले सोयाबीन आता बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहे. दिवसाला १० हजार क्विंटलहून अधिक आवक  (Arrivals)  होत आहे. मात्र, आवक वाढत असतानाही दर मात्र ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलच्या आसपासच स्थिर आहेत, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. (Soybean Market Update)

खरिपाच्या तयारीसाठी विक्रीची घाई

मृग नक्षत्राची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी मशागत व पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांसारख्या निविष्ठांची खरेदी करण्यासाठी त्यांना तातडीने पैशांची गरज भासत आहे. परिणामी, शेतकरी साठवलेले सोयाबीन बाजारात विक्रीस आणत आहेत.

२ दिवसांत २० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक

गेल्या दोन दिवसांमध्ये वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत सुमारे २० हजार क्विंटलहून अधिक सोयाबीनची नोंद झाली आहे. विशेषतः वाशिम बाजार समितीत सोमवारी ५ हजार ४०० क्विंटल व मंगळवारी ४ हजार ६०० क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.

दर मात्र स्थिरच 

सद्यस्थितीत सोयाबीनच्या किमतीत फारशी हालचाल दिसून येत नाही. मागणी कमी असल्याने दर दबावात आहेत. सोमवारी वाशिम बाजारात मिल क्वालिटी सोयाबीनला कमाल ४ हजार २८० रुपये क्विंटल दर मिळाला. मात्र, सर्वसाधारण दर ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतमाल साठवून ठेवला होता, मात्र खरीपाच्या तयारीसाठी पैसे जमवताना सध्याच्या स्थिर आणि तुलनेने कमी दरातच त्यांना विक्री करावी लागत आहे. काही व्यापाऱ्यांच्या मते, आवक आणखी वाढल्यास दरात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : बाजारातील तेजीने सोयाबीनचे समीकरण बदलणार का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डबाजार समिती वाशिमपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती