Join us

Soybean Market Update : बाजारात वाढली सोयाबीनची आवक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:37 IST

Soybean Market Update : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दरात चढ-उतार होताना दिसत आहे.गत आठवड्यात सोयाबीनचे दर ४,९०० पर्यंत पोहोचले होते. आता कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Soybean arrivals)

Soybean Market Update : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दरात चढ-उतार होताना दिसत आहे.गत आठवड्यात सोयाबीनचे दर ४,९०० पर्यंत पोहोचले होते. (Soybean arrivals)

काही दिवसांपूर्वी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल साठवून ठेवला होता. (Soybean arrivals)

मात्र, या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाल्याने बाजारात आवक वाढली आणि त्याचा परिणाम म्हणून दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे.(Soybean arrivals)

शनिवारी वाशिम जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे कमाल सरासरी दर ४ हजार ७०० रुपयांच्या खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गत हंगामापासून दरात घट

मागील हंगामापूर्वी सोयाबीनचे दर ५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, हंगाम सुरू होताच दरात घसरण झाली. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जून महिन्यापर्यंत तर दर ४ हजार रुपयांच्या खाली आले होते.

सोयाबीनचा साठा कमी होत असतानाच पुन्हा दरवाढीची चिन्हे दिसू लागली. मागील मंगळवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता. या तेजीमुळे साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांनी विक्री सुरू केली. परिणामी बाजारात आवक वाढली आणि दरात पुन्हा घसरण सुरू झाली.

चार दिवसांत २०० रुपयांची घसरण

मंगळवारी सोयाबीनचे दर ४ हजार ९०० रुपयांच्या आसपास होते. पण अवघ्या चार दिवसांत दर क्विंटलमागे जवळपास २०० रुपयांनी घसरले. यामुळे सोयाबीन पाच हजारांचा टप्पा गाठण्याऐवजी पुन्हा घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांतील दर (प्रति क्विंटल)

वाशिम : ४ हजार ७७० रुपये

कारंजा : ४ हजार ७४५ रुपये

रिसोड : ४ हजार ७१० रुपये

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : ४,५०० वर अडकलेले भाव आता वाढले; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती