Join us

Soybean Market Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन बाजारात चैतन्य; चार दिवसांत सोयाबीनची विक्रमी आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:16 IST

Soybean Market Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybeans Arrival) झपाट्याने वाढत आहे. वाचा सविस्तर

 Soybean Market Update : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybeans Arrival)  झपाट्याने वाढत आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारीपासून गुरुवारी या चार दिवसांत तब्बल २८ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले, असे बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले.

मुख्य बाजार समित्यांमध्ये वाढलेली आवक

जिल्ह्यात सोयाबीन सोंगणी व काढणीचे काम वेगात सुरू असून, दिवाळीच्या सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना हाती थोडा पैसा मिळावा यासाठी त्यांनी विक्रीवर जोर दिला आहे.

सोयाबीनची आवक  (Soybeans Arrival)  फक्त कारंजा बाजार समितीतच नाही तर वाशिम, मंगरुळपीर, रिसोड, मानोरा, मालेगाव यांसह इतर उपबाजारांमध्येही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

चार दिवसांतील सोयाबीन आवक (क्विंटल)

दिवसआवक (क्विंटल)
सोमवार६,५००
मंगळवार७,०००
बुधवार७,५००
गुरुवार७,०००
एकूण२८,०००

दरात वाढ; शेतकऱ्यांना थोडे समाधान

कारंजा बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला किमान ३ हजार ६१० ते कमाल ४ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. 

मागील काही दिवसांपासून दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर थोडे समाधान मिळाले आहे.

तथापि, ओलाव्यामुळे सोयाबीनच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन दर अजूनही अपेक्षेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या गरजेपुरतेच विक्री करत आहेत.

दिवाळीनंतर आवक आणखी वाढणार

सद्यः स्थितीत काढणी वेगाने सुरू असून, दिवाळीनंतर बाजारात सोयाबीनची आवक आणखी वाढणार आहे. त्यामुळे बाजारभाव स्थिर राहण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध विक्रीचे मार्गदर्शन आवश्यक ठरणार आहे.

चार दिवसांत कारंजा बाजार समितीत २८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक

दर: ३ हजार ६१० ते ४ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची विक्री जोरात

पुढील दिवसांत बाजारात आवक आणखी वाढणार

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : कापूस खरेदी केंद्र उघडले; पण आता नोंदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू

English
हिंदी सारांश
Web Title : Record Soybean Arrival in Four Days Before Diwali

Web Summary : Karanja market sees a record 28,000 quintals of soybean arrival in four days as farmers sell before Diwali. Prices rise slightly, offering farmers some relief. Higher arrivals expected post-Diwali.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती