Join us

Soybean Market : दीड वर्षानंतर सोयाबीन दरात झपाट्याने वाढ; वाचा काय मिळतोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:43 IST

Soybean Market : मागील दीड वर्षापासून स्थिर असलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक तेजी आली असून, गेल्या आठवडाभरात प्रतिक्विंटल ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ ज्या वेळी हवी होती त्या वेळी झाली नसल्याने, बहुतांश शेतकरी आपला साठा आधीच विकून बसले आहेत. व्यापाऱ्यांना मात्र या वाढीचा मोठा फायदा होताना दिसत आहे. (Soybean Market)

Soybean Market : मागील दीड वर्षापासून स्थिर असलेल्या सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल ६०० रुपयांनी वाढला आहे.  (Soybean Market)

या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत असून, बहुतांश शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने साठवलेले सोयाबीन आधीच विकले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. (Soybean Market)

तालुक्यात दोन महिने हमीभाव केंद्र सुरू होते. जिथे शासनाने प्रतिक्विंटल ४ हजार ८०० रुपयांनी सोयाबीन खरेदी केले. त्यावेळीही व्यापाऱ्यांनीच याचा जास्त फायदा घेतला.  (Soybean Market)

हमीभाव वगळता वर्ष-दीड वर्षानंतर आता दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ऑइल मिल्समध्ये सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.  (Soybean Market)

बाजारात ४ हजार ८०० रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ होऊनही सोयाबीनचे भाव स्थिर होते. काही केल्या भाव वाढत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरात सोयाबीनसाठा करून नंतर जसा भाव मिळेल तसा विकून टाकला. (Soybean Market)

शेतकऱ्यांची व्यथा

भाव वाढण्याची अपेक्षा ठेवून मी महिनाभरापूर्वी साठवलेले ५० क्विंटल सोयाबीन विकले. आता भाव ६०० रुपयांनी वाढले आहेत. ज्यावेळेस भाव वाढायला पाहिजे होते. त्यावेळी मात्र कमी किमतीत सोयाबीन विकावे लागले. - बालाजी दळवी, शेतकरी

शेतकरी अनेक दिवस भाव वाढण्याची वाट पाहात होता. परंतु, शेतमाल विक्री केल्यावर लगेच भाव वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. भाववाढीचा अधिकतर फटका शेतकऱ्यांना बसत आहे. - दिलीप सावळे, शेतकरी

व्यापाऱ्यांच्या मते सदरील भाववाढ अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. एका आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात तेजी आली आहे. ऑइल मिलमध्ये ५ हजार ते ५ हजार १५० रुपये भाव मिळत आहे. तसेच बाजारात ४ हजार ८०० रुपयांपर्यंत खरेदी सुरू आहे. वर्षात पहिल्यांदाच दरात एवढी वाढ झाली आहे.- असद शेख नूर, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन दरात उसळी; जुन्या सोयाबीनला सोन्याचा भाव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती