Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Market : सोयाबीनची विक्रमी आवक; वाशिम बाजार समिती सोमवारपर्यंत बंद वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:49 IST

Soybean Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई सोयाबीनला मिळणाऱ्या उच्च दरांमुळे शेतकऱ्यांचा मोठा ओघ झाला आहे. तब्बल २८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याने मोजणीसाठी आणखी चार दिवस लागणार असून, सोमवारपर्यंत (१७ नोव्हेंबर) बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. (Soybean Market)

Soybean Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई सोयाबीनला मिळणाऱ्या उच्चांकी दरामुळे परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी धाव घेतली असून, गेल्या दोन दिवसांत सोयाबीनची तब्बल २८ हजार क्विंटल विक्रमी आवक झाली आहे.  (Soybean Market)

या प्रचंड आवकेमुळे मोजणीचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी सोमवार ( १७ नोव्हेंबर) पर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Soybean Market)

सोयाबीनला समाधानकारक दर

वाशिम बाजार समितीत या आठवड्यात बिजवाई सोयाबीनला वाणानुसार प्रतिक्विंटल ५ हजार ते ८ हजारदरम्यान भाव मिळत आहेत.

राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत वाशिम येथे दर समाधानकारक मिळत असल्याने अकोला, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला माल विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

या वाढलेल्या आवकेमुळे व्यापाऱ्यांना आणि अडत्यांना मोजमाप व लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे.

जागेचा तुटवडा, मोजणीसाठी वेळ लागणार

बाजार समिती परिसरात उपलब्ध जागा मर्यादित असल्याने सोयाबीनचे पोते साठवणे आणि मोजमाप करणे अवघड झाले आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने काही दिवस बाजार बंद ठेवून मोजणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापारी व अडत्यांचा सहभाग

बाजार समितीतील व्यापारी, अडते आणि मोजणी कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. दररोज नव्या ट्रकने सोयाबीनची आवक सुरू असल्याने बाजारात गडबडीतही शिस्त राखली जात आहे.

शेतकऱ्यांचा उत्साह वाढला

सोयाबीनच्या उच्च दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी बिजवाई सोयाबीन थेट वाशिममध्ये विकण्याचा निर्णय घेतल्याने बाजार परिसरात ट्रॅक्टर, ट्रॉली आणि ट्रकची गर्दी दिसत आहे.

वाशिम बाजार समितीत दर स्थिर असून व्यवहार पारदर्शक आहेत, त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला आहे.

वाशिम बाजार समितीत बिजवाई सोयाबीनची विक्रमी २८,००० क्विंटल आवक

दर प्रतिक्विंटल ५ हजार ते ८ हजारदरम्यान

मोजणीसाठी लागणार चार दिवस

सोमवार (दि.१७ नोव्हेंबर) पर्यंत बाजार समिती बंद

परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

बाजारात चैतन्य

सोयाबीनच्या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. वाशिम बाजार समिती व्यवस्थापनाकडून सर्व व्यवहार पारदर्शकपणे पार पाडले जात असून, मोजणी पूर्ण होताच बाजार पुन्हा सुरु केला जाणार आहे.

सोयाबीनची आवक प्रचंड वाढल्याने बाजार समितीत उपलब्ध जागाही कमी पडत आहे. सोमवारपर्यंत मोजणी पूर्ण करण्यासाठी बाजार समिती बंद राहील. - वामनराव सोळंके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम

वाशिममध्ये दर समाधानकारक असल्याने परजिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने माल आणत आहेत. यामुळे आवक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.- चरण गोटे, संचालक, बाजार समिती वाशिम

हे ही वाचा सविस्तर : 

English
हिंदी सारांश
Web Title : 28,000 Quintals of Soybean Arrive; Measurement to Take Four Days!

Web Summary : Washim market overwhelmed with 28,000 quintals of soybean; measurement delays cause market closure until Monday. Farmers flock to Washim for better prices.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्डबाजार