लातूर : यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांचे पीक पुरात वाहून गेले, तर काही ठिकाणी उत्पादनात लक्षणीय घट झाली. (Soybean Market)
असे असतानाही बाजारभावात अपेक्षित वाढ होत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र, शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दराने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Soybean Market)
यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा आणि डॅमेज दिसून आले. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर दर्जा निकष पूर्ण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारण्यात आले. (Soybean Market)
परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात कमी दराने माल विकावा लागला. यामुळे प्रतिक्विंटल ७०० ते १,००० रुपयांपर्यंत आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. (Soybean Market)
हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनचे दर सातत्याने ४ हजार ५०० रुपयांच्या आसपासच रेंगाळत होते. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे खर्चही निघेनासा झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीनचा माल साठवून ठेवण्यालाच प्राधान्य दिले होते.
आवक घटली, दरांना बळ
गेल्या काही दिवसांपासून बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली आहे. मालाची उपलब्धता कमी झाल्याचा थेट परिणाम आता दरावर दिसून येऊ लागला आहे.
शुक्रवारी लातूर बाजार समितीत झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारात सोयाबीनला कमाल ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल, तर सर्वसाधारण दर ४ हजार ८०० रुपये इतका मिळाला. बऱ्याच दिवसांनंतर झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी सुखावणारी ठरली आहे.
बाजारातील आवक व दर (डिसेंबर)
२२ डिसेंबर : आवक ८,१०८ क्विंटल – कमाल दर ४,९१३
२३ डिसेंबर : आवक ८,१८१ क्विंटल – कमाल दर ४,९००
२४ डिसेंबर : आवक ८,७३३ क्विंटल – कमाल दर ४,९५०
२५ डिसेंबर : आवक १३,७३७ क्विंटल – कमाल दर ५,०००
२६ डिसेंबर : आवक १५,४३१ क्विंटल – कमाल दर ५,१००
शुक्रवारी लातूर बाजार समितीत तब्बल १५ हजार ४३१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. दर वाढल्याने आवक वाढल्याचे चित्र दिसून आले. चालू आठवड्यात मात्र आवक सरासरी ८ हजार क्विंटलच्या आसपास होती आणि सर्वसाधारण दर प्रतिक्विंटल ४,८०० रुपयांच्या आत-बाहेर होता.
पुढील काळात दर वाढणार?
बाजार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर बाजारात सोयाबीनची आवक मर्यादित राहिली आणि मागणी वाढली, तर येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. सध्या मिळालेल्या दरवाढीमुळे तरी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, पुढील आठवड्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Latur farmers rejoice as soybean prices exceed ₹5,000/quintal after facing losses due to heavy rains and quality issues. Increased demand may further boost prices.
Web Summary : भारी बारिश और गुणवत्ता संबंधी समस्याओं के कारण नुकसान झेल रहे लातूर के किसानों को सोयाबीन की कीमतों में ₹5,000/क्विंटल से अधिक की वृद्धि से खुशी मिली। मांग बढ़ने से कीमतों में और तेजी आ सकती है।