Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soyabean Market :'या' सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळतोय, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:47 IST

Soyabean Market : आज सोयाबीनला राज्यातील बाजारात काय भाव मिळाला? ते पाहुयात..

Soyabean Market : खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी यंदा सोयाबीनची लागवड (Soyabean Sowing) किती होते हे पहावे लागणार आहे. कारण या वर्षात सोयाबीनला समाधानकारक दर मिळाला नसल्याचे चित्र आहे. 

आज 14 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 03 हजार 900 रुपये पासून ते सरासरी 4300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 14 जून रोजी अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी 4 हजार 895 रुपये, आर्वी बाजारात 04 हजार रुपये, बीड बाजारात 04 हजार 100 रुपये, वाशिम बाजारात चार हजार 370 रुपये दर मिळाला. 

गेवराई बाजारात 4 हजार 100 रुपये, देऊळगाव राजा बाजारात चार हजार रुपये, उमरखेड आणि सिंदि बाजारात तीन हजार 900 रुपये, देवणी बाजारात 4 हजार 180 रुपये दर मिळाला. 

तर लोकल सोयाबीनला सोलापूर बाजारात चार हजार 290 तर नागपूर बाजार चार हजार 130 रुपये, कोपरगाव बाजारात चार हजार 211 रुपये दर मिळाला. तसेच सर्वसाधारण सोयाबीनला माजलगाव, तुळजापूर , राहता बाजारात चार हजार 200 रुपये दर मिळाला.

टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती