soyabean Market : सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमतीत MSP च्या दिशेने वाढ होत असल्याचे दिसून आहेत. सध्या सुरु असलेल्या फेब्रुवारी महिन्यात हे दर कसे राहतील, हे पाहुयात...
सुरवातीला मागील तीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील सरासरी किंमती - फेब्रुवारी २०२३ मध्ये ५ हजार ३१७ रुपये प्रति क्विंटल, फेब्रुवारी २०२४ मध्ये ४ हजार ५२० रुपये प्रति क्विंटल, फेब्रुवारी २०२५ मध्ये ४ हजार ८४ रुपये प्रति क्विंटल होत्या. तर या फेब्रुवारी २०२६ मध्ये ५ हजार ते ५ हजार ४९० रुपये प्रति क्विंटल राहतील.
सन २०२४-२५ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२०२४ मध्ये १९.७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये निर्यात १७.८० लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १०५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत १७ कमी असल्याचे दिसते. चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक नोव्हेंबर २०२५ पासून कमी झाल्याचे दिसून आले. सन २०२४- २५ मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत वाढ झालेली होती. २०२५-२०२६ च्या अंदाजानुसार आयातीत २२ टक्क्यांनी घट दिसून येते.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी सोयाबीन पिकांच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे.
Web Summary : Soybean prices are exceeding MSP. February 2026 forecasts range ₹5000-₹5490/quintal. Soybean meal exports decreased, and soybean production might be lower. Oil imports are also expected to decline, according to Smart Project analysis.
Web Summary : सोयाबीन की कीमतें MSP से अधिक हैं। फरवरी 2026 का पूर्वानुमान ₹5000-₹5490/क्विंटल है। सोयामील का निर्यात घटा, सोयाबीन उत्पादन कम हो सकता है। स्मार्ट परियोजना विश्लेषण के अनुसार तेल आयात भी घटने की उम्मीद है।