Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Cotton Market : सोयाबीनच्या दरात वाढ, पण कापूस हमीभावापासून दूरच वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:08 IST

Soybean Cotton Market : केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करूनही परभणी जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पिकाला त्याचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. बाजार समितीत सोयाबीनला ४ हजार ८०० ते ४ हजार ८५० रुपये दर मिळत असून कापसाच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. (Soybean Cotton Market)

Soybean Cotton Market : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, या उद्देशाने केंद्र सरकारकडून कापूससोयाबीनसाठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. (Soybean Cotton Market)

मात्र, प्रत्यक्ष बाजारात परिस्थिती वेगळीच दिसून येत असून, जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांना जाहीर हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. (Soybean Cotton Market)

सध्या सोयाबीनचा दर ४ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला असला तरी तो हमीभावाच्या तुलनेत सुमारे ४५० रुपये कमी आहे. तर कापसाच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरूच आहे.(Soybean Cotton Market)

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकरी आधीच आर्थिक कोंडीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून विविध दिलासादायक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. (Soybean Cotton Market)

मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नसल्याची तक्रार आहे.(Soybean Cotton Market)

बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दर

सोमवारी परभणी शहरातील बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोयाबीन व कापसाच्या बाजाराची पाहणी करण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे २०० ते २५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

या सोयाबीनला ४ हजार ८०० ते ४ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. प्रत्यक्षात सोयाबीनसाठी केंद्र शासनाने ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल शेकडो रुपयांचे नुकसान होत आहे.

दुसरीकडे कापसाला खाजगी व्यापाऱ्यांकडून सोमवारी ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल असा दर देण्यात आला. मात्र कापसाच्या दरात सातत्य नसून रोज चढ-उतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात आहे.

हमीभाव खरेदीत अडथळे

जिल्ह्यात पणन विभागामार्फत सोयाबीनसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे. मात्र या केंद्रांवर सोयाबीन विक्री करण्यासाठी सातबारावर पेर्याची नोंद, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता अशा अनेक अटी असल्याने शेतकरी या प्रक्रियेतच अडकून पडत आहे.

अनेक शेतकऱ्यांची पेरणी नोंद अद्याप अद्ययावत नसणे, ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणी तसेच खरेदीचे मर्यादित शेड्यूल यामुळे प्रत्यक्षात हमीभावाचा लाभ फारच मोजक्यांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची मागणी

हमीभाव जाहीर करूनही प्रत्यक्ष बाजारात तो मिळत नसेल, तर त्याचा फायदा काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

प्रशासनाने हमीभाव खरेदी प्रक्रिया सुलभ करावी, कागदपत्रांच्या अटी शिथिल कराव्यात आणि खरेदी केंद्रांची क्षमता वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा खाजगी व्यापाऱ्यांच्या मर्जीवरच शेतमाल विकावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर :Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक घटली; दर्जेदार मालाला भाव वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean prices rise, cotton lags MSP; farmers face challenges.

Web Summary : Soybean prices increased but remain below MSP, while cotton fluctuates. Farmers struggle with outdated land records, hindering access to government procurement centers and fair prices. They demand easier access to MSP benefits.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती