Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनची चलती; काही बाजारांत 'इतक्या' हजार रुपयांचा भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:22 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (७ जानेवारी) रोजी सोयाबीनची आवक (Soybean Arrival)  ४६ हजार क्विंटलच्या पुढे पोहोचली आहे.

पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी राहिली असून काही बाजारांत ५ हजार रुपयांच्या पुढील दर मिळाले. एकूणच बाजारात दर स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. (Soybean Arrival)

पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी

पिवळ्या सोयाबीन या जातीला सर्वाधिक मागणी राहिली. यवतमाळ बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. वाशिम येथे गुणवत्तेच्या आधारे ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना समाधान मिळत आहे. 

देवणी, सावनेर, दिग्रस, जळकोट, नागपूर, केज या बाजारांतही पिवळ्या जातीला चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रमुख बाजार समित्यांतील आवक

सर्वाधिक आवक कारंजा (७ हजार ५०० क्विंटल), जालना (५ हजार ८ क्विंटल), अकोला (५ हजार १४२ क्विंटल), अमरावती (५,०४६ क्विंटल) आणि वाशिम (३,३०० क्विंटल) या बाजार समित्यांमध्ये झाली. या बाजारांत व्यवहाराचा वेग चांगला राहिला.

बाजारभावातील स्थिती

जळगाव (जिल्हा बाजार) येथे हमीभावाच्या जवळपास ५ हजार ३२८ रुपये दर मिळाला.

यवतमाळ, सावनेर, देवणी येथे ५ हजार रुपयांच्या पुढील दर दिसून आले.

काही बाजारांत मात्र हिंगणघाट (३,६००), पाचोरा (४,२००), आर्वी (४,५५०) येथे दर दबावात राहिले. एकूणच राज्यभरात दर ३ हजार ४०० ते ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान फिरताना दिसले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तरशेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2026
जळगाव---क्विंटल212532853285328
माजलगाव---क्विंटल1355400049804900
चंद्रपूर---क्विंटल121420048904795
राहूरी -वांबोरी---क्विंटल1480048004800
पाचोरा---क्विंटल300340049014200
कारंजा---क्विंटल7500420050354745
तुळजापूर---क्विंटल675485048504850
वडवणी---क्विंटल1470047004700
धुळेहायब्रीडक्विंटल3395046454200
सोलापूरलोकलक्विंटल328360051014700
अमरावतीलोकलक्विंटल5046440048004600
जळगावलोकलक्विंटल126392548504800
नागपूरलोकलक्विंटल1104440050004850
हिंगोलीलोकलक्विंटल1120440049004650
जळकोटपांढराक्विंटल818470050004850
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल130410049514500
जालनापिवळाक्विंटल5008400053004875
अकोलापिवळाक्विंटल5142400049854800
यवतमाळपिवळाक्विंटल1136550055005500
आर्वीपिवळाक्विंटल450350049504550
हिंगणघाटपिवळाक्विंटल1815310050753600
वाशीमपिवळाक्विंटल3300444567006200
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल331430048504575
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1350420049604580
मलकापूरपिवळाक्विंटल1110426551004750
दिग्रसपिवळाक्विंटल370482550354975
सावनेरपिवळाक्विंटल36500051455100
देउळगाव राजापिवळाक्विंटल28430048564800
नांदगावपिवळाक्विंटल36407549134913
केजपिवळाक्विंटल138445049004800
अहमहपूरपिवळाक्विंटल1690400049814779
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1972453049254727
मुखेडपिवळाक्विंटल33450050254850
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल31445050004800
सेनगावपिवळाक्विंटल129440049004600
नांदूरापिवळाक्विंटल850390048374837
बुलढाणापिवळाक्विंटल120425048504250
घाटंजीपिवळाक्विंटल120370050004500
बाभुळगावपिवळाक्विंटल1250390152404601
काटोलपिवळाक्विंटल383341149214450
पुलगावपिवळाक्विंटल102350045504450
सिंदीपिवळाक्विंटल83384050004660
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल671365050004810
देवणीपिवळाक्विंटल98478051454962

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनला बाजाराचा आधार; आवक वाढूनही दर टिकून वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Price: Yellow soybean in demand; prices rise in markets.

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra's agricultural markets exceed 46,000 quintals. Yellow soybean is highly sought after, fetching prices over ₹5,000 in some markets. Wasim market saw prices as high as ₹6,700/quintal based on quality.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड