Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला आज किती भाव; कोणत्या बाजारात आवक घटली? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:55 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (१७ जानेवारी) रोजी सोयाबीनची मध्यम स्वरूपाची आवक झाली.

काही प्रमुख बाजारांत आवक घटल्याने दरात चढ-उतार दिसून आला. पिवळ्या व लोकल जातीला चांगली मागणी राहिली.

आज सोयाबीनची एकूण १८ हजार ४५३ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. प्रमुख बाजार समित्यांमध्ये आवक कमी-जास्त असल्याने दरात फरक पाहायला मिळाला. सोयाबीनला आज किमान ३,२०० रुपये ते कमाल ५,३८० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

अमरावती, अकोला, हिंगोली आणि अहमदपूर या बाजारांत मोठ्या प्रमाणात आवक झाली. 

अमरावती बाजारात सर्वाधिक ३,३७८ क्विंटल आवक असून येथे दर ४,८०० ते ५,२२५ रुपये राहिला. अकोला बाजारात ३,७३३ क्विंटल आवक झाली असून पिवळ्या सोयाबीनला सरासरी ५,००० रुपये भाव मिळाला. अहमदपूर येथे २,००० क्विंटल आवक असून सरासरी दर ५,१३३ रुपये नोंदविण्यात आला.

दुसरीकडे चंद्रपूर, राहुरी-वांबोरी, मालेगाव, मुखेड, परतूर या बाजारांत आवक मर्यादित राहिली. कमी आवक असलेल्या बाजारांत तुलनेने स्थिर किंवा चांगले दर मिळाल्याचे दिसून आले. कोरेगाव बाजारात केवळ ३५ क्विंटल आवक असून थेट ५, ३२८ रुपये असा एकसारखा दर मिळाला.

कोणत्या जातीला मागणी

आज बाजारात पिवळा सोयाबीन सर्वाधिक मागणीत राहिला. अकोला, मुर्तीजापूर, उमरेड, हिंगणघाट, अहमदपूर, देवणी या बाजारांत पिवळ्या जातीला चांगला प्रतिसाद मिळाला. 

तसेच लोकल सोयाबीनला अमरावती, सोलापूर, हिंगोली, मेहकर बाजारात समाधानकारक भाव मिळाला. 

लासलगाव-निफाड येथे पांढऱ्या सोयाबीनला कमाल ५,३८० रुपये दर मिळाल्याने लक्ष वेधले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2026
माजलगाव---क्विंटल917400052005000
चंद्रपूर---क्विंटल27460051304995
राहूरी -वांबोरी---क्विंटल26420051004888
कोरेगाव---क्विंटल35532853285328
राहता---क्विंटल37510052205160
सोलापूरलोकलक्विंटल121490552905130
अमरावतीलोकलक्विंटल3378480052255012
अमळनेरलोकलक्विंटल30450051005100
हिंगोलीलोकलक्विंटल820480053005050
मेहकरलोकलक्विंटल800440053355150
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल310355153805320
अकोलापिवळाक्विंटल3733430052205000
मालेगावपिवळाक्विंटल1505050505050
आर्वीपिवळाक्विंटल500350052004700
हिंगणघाटपिवळाक्विंटल1488320052604000
उमरेडपिवळाक्विंटल1351400052204820
भोकरदनपिवळाक्विंटल69490051005000
भोकरपिवळाक्विंटल92450551464825
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल230460051004850
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल700480053155060
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल44520052525220
परतूरपिवळाक्विंटल13500052715220
वरूडपिवळाक्विंटल376390052014873
देउळगाव राजापिवळाक्विंटल29500051245100
अहमहपूरपिवळाक्विंटल2000400052915133
मुखेडपिवळाक्विंटल26500053005250
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल20400042004100
सेनगावपिवळाक्विंटल100490051005000
उमरखेडपिवळाक्विंटल120465047504700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60460047504700
बाभुळगावपिवळाक्विंटल700400153204701
पुलगावपिवळाक्विंटल116350052005025
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल108385052004900
देवणीपिवळाक्विंटल76500052985149

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक घसरली; आज कुठे मिळाला ६ हजार रुपयांचा दर? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Prices Fluctuate; Arrival Declines Impact Rates Today

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra's agricultural markets saw moderate activity. Price fluctuations occurred due to decreased arrivals in key markets. Yellow and local varieties remained in demand. Prices ranged from ₹3,200 to ₹5,380 per quintal. Amravati and Akola saw significant arrivals, while Chandrapur and Rahuri-Wambori had limited stock.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती