Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन भावात उसळी; पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:19 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात आज चैतन्य दिसून आले आहे. अकोला आणि जालना बाजारात पिवळ्या सोयाबीनला विक्रमी दर मिळाले असून, एकूण आवक (Soybean Arrival)  ८१ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली आहे.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (८ नोव्हेंबर) एकूण ८१,३४८ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival)  नोंदवली गेली आहे.  सध्याच्या बाजारभावात सरासरी दर ४ हजार ३१० रु. प्रती क्विंटल एवढा राहिला आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला ७ हजार २०० रुपयांनपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले आहे.

आवक आणि दर

अकोला, लातूर, जालना, नागपूर, हिंगोली आणि अमरावती या प्रमुख बाजारात मोठी आवक झाली.

अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक ७ हजार २०० रु. प्रती क्विंटल दर मिळाला, तर सरासरी दर ६ हजार ९५५ रुपये होता.

जालना बाजारात चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ६ हजार ५११ रु. प्रती क्विंटल इतका दर मिळाला.

लातूर बाजारात १७ हजार ३७१ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर ४ हजार ५५० रु. नोंदवला गेला.

नागपूर बाजारात ३ हजार ७०६ क्विंटल आवक असून सर्वोच्च दर ४ हजार ५६० रु. नोंदवला गेला.

हिंगोलीत सोयाबीनला ४ हजार ४५० रुपयांनापर्यंत दर मिळाला तर सरासरी ४ हजार २२५ राहिला.

कोणत्या जातीला मागणी?

सध्या बाजारात 'पिवळा सोयाबीन' या जातीला सर्वाधिक मागणी आहे. चांगल्या प्रतीचा पिवळा सोयाबीन ६,५०० ते ₹७,२०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत विकला जात आहे. 

स्थानिक आणि डॅमेज सोयाबीनला तुलनेने कमी भाव मिळत आहेत. ३,००० ते ४,३०० रुपये होता.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/11/2025
जळगाव - मसावत---क्विंटल6300030003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल72432544534389
माजलगाव---क्विंटल2044360044754361
चंद्रपूर---क्विंटल107290042853564
राहूरी -वांबोरी---क्विंटल4423142554243
सेलु---क्विंटल151419644004200
तुळजापूरडॅमेजक्विंटल1250440044004400
सोलापूरलोकलक्विंटल134320045004211
अमरावतीलोकलक्विंटल13419385043004075
जळगावलोकलक्विंटल263300045404300
नागपूरलोकलक्विंटल3706390045604395
हिंगोलीलोकलक्विंटल1000400044504225
लातूरपिवळाक्विंटल17371427948514550
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल73395045304200
जालनापिवळाक्विंटल13850340065116511
अकोलापिवळाक्विंटल4797400072006955
चिखलीपिवळाक्विंटल2050385049704400
हिंगणघाटपिवळाक्विंटल4831280044753200
बीडपिवळाक्विंटल206415045004390
पैठणपिवळाक्विंटल2406240624062
भोकरदनपिवळाक्विंटल78420044004300
भोकरपिवळाक्विंटल103382545214173
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल393370043004000
जिंतूरपिवळाक्विंटल616400564005700
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल4150370044504075
मलकापूरपिवळाक्विंटल2240330050504200
सावनेरपिवळाक्विंटल95360144134200
जामखेडपिवळाक्विंटल169350042003850
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1420042004200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल610385044814420
निलंगापिवळाक्विंटल687430045004400
हादगावपिवळाक्विंटल150440046004450
हादगाव-तामसापिवळाक्विंटल300440046004500
मुखेडपिवळाक्विंटल100375146004450
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल15370043004000
मुरुमपिवळाक्विंटल991375144504229
पाथरीपिवळाक्विंटल72320043003951
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल210390045004200
सिंदखेड राजापिवळाक्विंटल416400045004200
राळेगावपिवळाक्विंटल215370044404250
उमरखेडपिवळाक्विंटल70400042004100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल4170400042004100
बाभुळगावपिवळाक्विंटल1900320147554001
पुलगावपिवळाक्विंटल275300046004050
सिंदीपिवळाक्विंटल232265043003500
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल125238041353500

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : बिजवाई सोयाबीनचा दर उच्चांकावर; प्रती क्विंटल तब्बल 'इतक्या' रुपयांनी वाढ वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Surge: Yellow Variety in High Demand at Market

Web Summary : Soybean markets are lively, especially for the yellow variety. Akola and Jalna saw record prices, with arrivals reaching 81,000 quintals. Yellow soybean fetches up to ₹7,200/quintal, while local varieties get lower rates. Check market-wise prices!
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती