Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार तेजीत; वाशीममध्ये भाव पोहोचले ७ हजार पार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:32 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (६ नोव्हेंबर) रोजी सोयाबीन दरात वाढ दिसून आली असून गुणवत्तापूर्ण मालाला ७ हजारापेक्षा जास्त भाव मिळाला. वाशीम, अकोला आणि लातूरमध्ये सोयाबीन दर सर्वाधिक राहिले. (Soybean Arrival)

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चांगले दर मिळताना दिसत आहेत. आजच्या (६ नोव्हेंबर) रोजी बाजारभावानुसार, सोयाबीनचा कमाल दर ७,३३० रु. प्रति क्विंटल, तर किमान दर १,३९९ रु. प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला. राज्यभरात एकूण ७९,७९७ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर ४,२५२ रु. इतका राहिला. (Soybean Arrival)

दरांमध्ये ठळक बाबी

वाशीम बाजारात उच्चांक: ७,३३० रु. प्रति क्विंटलचा सर्वाधिक दर नोंद.

लातूर, अकोला, जळकोट येथे दर ४,५०० रु. पेक्षा जास्त, म्हणजेच चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनला मोठी मागणी होती.

अमरावती, पुसद, हिंगोली येथे आवक जास्त असून सरासरी दर ४,२००–४,४०० रु.  दरम्यान राहिला.

नांदगाव येथे सर्वात कमी दर १,३९९ रु. नोंदवला गेला.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला सोयाबीन दरांमध्ये स्थिरता आणि वाढ दिसत आहे. गुणवत्तापूर्ण पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी असून पुढील काही दिवसांत दरांमध्ये थोडीशी वाढ अपेक्षित आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/11/2025
अहिल्यानगर---क्विंटल636360043503975
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल51415043574254
माजलगाव---क्विंटल3978370044504300
पुसद---क्विंटल876400044604425
पाचोरा---क्विंटल500375145514100
सिल्लोड---क्विंटल28400045004200
अचलपूर---क्विंटल500350041503775
तुळजापूरडॅमेजक्विंटल1475440044004400
धुळेहायब्रीडक्विंटल22390042954000
सोलापूरलोकलक्विंटल523350045154200
अमरावतीलोकलक्विंटल21408375042604005
जळगावलोकलक्विंटल312340044954250
नागपूरलोकलक्विंटल2890390044004275
हिंगोलीलोकलक्विंटल1520400545054255
जळकोटपांढराक्विंटल727440046004500
लातूरपिवळाक्विंटल15870420047514500
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल52390045004200
अकोलापिवळाक्विंटल4602400057205555
मालेगावपिवळाक्विंटल13429544704370
बीडपिवळाक्विंटल202330046004283
वाशीमपिवळाक्विंटल4500392573306500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600405044004150
पैठणपिवळाक्विंटल10409042114091
चाळीसगावपिवळाक्विंटल40380043214000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल5300382545004165
मलकापूरपिवळाक्विंटल2440310045003850
दिग्रसपिवळाक्विंटल660385043804185
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल55410046004360
मनवतपिवळाक्विंटल483390044004275
देउळगाव राजापिवळाक्विंटल99300044003700
नांदगावपिवळाक्विंटल17139943254325
गंगापूरपिवळाक्विंटल31386541704000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल503392044884204
मुखेडपिवळाक्विंटल92435045754450
मुरुमपिवळाक्विंटल612370044204055
सेनगावपिवळाक्विंटल138385043004125
सिंदखेड राजापिवळाक्विंटल398380045004200
उमरखेडपिवळाक्विंटल80395042004100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल300395042004100
राजूरापिवळाक्विंटल374330543004150
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल282300044053900
पुलगावपिवळाक्विंटल285290546404170
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल4400255045004000
आर्णीपिवळाक्विंटल1475400046004300
देवणीपिवळाक्विंटल308380045214160
बोरीपिवळाक्विंटल130422043504250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सीड क्वालिटी सोयाबीनलाही 'हमी' नाही; दर वाढीची प्रतीक्षा वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Surges: Prices Cross ₹7,000 in Washim

Web Summary : Soybean prices are rising in Maharashtra, especially in Washim, Akola, and Latur. Top quality beans fetch over ₹7,000/quintal. The highest price was recorded in Washim at ₹7,330. Overall arrival in state markets was around 79,797 quintals with an average price of ₹4,252.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती