Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात आवक वाढली; कुठे भाव वधारले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:51 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये आज ( १६ डिसेंबर) रोजी संमिश्र चित्र पाहायला मिळाले. एकूण ५३ हजार १५५ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival)  झाली असताना, गुणवत्तेनुसार दर ठरले.

विशेषतः पिवळ्या सोयाबीनला मागणी कायम राहिल्याने काही बाजारांत दर वधारले, तर मोठ्या आवकेमुळे काही ठिकाणी भावांवर दबाव दिसून आला. (Soybean Arrival)

आवक वाढली; लातूर, कारंजा, अमरावती आघाडीवर

आजच्या दिवशी लातूर (१७,०५० क्विंटल), कारंजा (८,००० क्विंटल), अमरावती (४,३८० क्विंटल), जालना (४,४६४ क्विंटल) आणि वाशीम (३,३०० क्विंटल) या बाजारांत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. मोठ्या आवकेमुळे काही बाजारांत दर स्थिर राहिले, तर गुणवत्तेनुसार भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी

पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले. वाशीम, जालना, अकोला, लातूर, उमरखेड, रिसोड या बाजारांत पिवळ्या सोयाबीनला चांगले दर मिळाले. विशेषतः वाशीम बाजारात पिवळ्या सोयाबीनला प्रतिक्विंटल कमाल ६,२५० रुपये असा उच्चांक नोंदविण्यात आला.

कोणत्या बाजारात दर वधारले?

वाशीम : सरासरी ५,८०० रुपये (कमाल ६,२५०)

जालना : कमाल ५,२०० रुपये

रिसोड : सरासरी ४,३२८ रुपये

उमरखेड / उमरखेड-डांकी : सरासरी ४,५०० रुपये

लातूर, अकोला, बारामती : सरासरी ४,४०० रुपये

या बाजारांत दर्जेदार मालाची आवक मर्यादित असल्याने दरांना आधार मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

काही बाजारांत दरांवर दबाव

चंद्रपूर, पाचोरा, दर्यापूर, जामखेड या बाजारांत कमी दर्जाचा किंवा मिश्र माल आल्याने दर तुलनेने कमी राहिले. चंद्रपूरमध्ये किमान २,९९५ रुपये, तर दर्यापूरमध्ये सरासरी ३,९०० रुपये दर नोंदविण्यात आला.

बाजारात सध्या आवक वाढत असली तरी दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढल्यास दरांमध्ये मर्यादित चढ-उतार होण्याची शक्यता असून, साठवणूक क्षमतेनुसार शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन करावे, असा सल्ला दिला जात आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/12/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल76349943413920
माजलगाव---क्विंटल1177350044954300
चंद्रपूर---क्विंटल73299543703995
पाचोरा---क्विंटल120310044083500
कारंजा---क्विंटल8000408044504285
रिसोड---क्विंटल2214401546404328
तुळजापूरडॅमेजक्विंटल580440044004400
सोलापूरलोकलक्विंटल79418545204320
अमरावतीलोकलक्विंटल4380390044004150
जळगावलोकलक्विंटल30420044354435
नागपूरलोकलक्विंटल455380044004250
हिंगोलीलोकलक्विंटल1000405045004275
बारामतीपिवळाक्विंटल122350044604400
लातूरपिवळाक्विंटल17050384045854400
जालनापिवळाक्विंटल4464360052004400
अकोलापिवळाक्विंटल2758406046754400
मालेगावपिवळाक्विंटल25422543754311
वाशीमपिवळाक्विंटल3300401562505800
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600415046754450
उमरेडपिवळाक्विंटल2270350047104250
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1090350047504200
जिंतूरपिवळाक्विंटल288410044354300
सावनेरपिवळाक्विंटल45410043804250
जामखेडपिवळाक्विंटल100380043004050
दर्यापूरपिवळाक्विंटल1000300044403900
नांदगावपिवळाक्विंटल31436343774363
घाटंजीपिवळाक्विंटल70370044854150
उमरखेडपिवळाक्विंटल360440045504500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70440045504500
बाभुळगावपिवळाक्विंटल1100350148254201
काटोलपिवळाक्विंटल167371144504250
पुलगावपिवळाक्विंटल61374041504075

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Soybean Seed Market : सोयाबीन सिड्सची आवक घटली; दर सुधारले आहेत का? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Update: Increased Arrivals, Price Variations Across Markets

Web Summary : Soybean arrivals increased in Maharashtra, with mixed price trends. Yellow soybean demand boosted rates in Washim, Jalna, and Risod. Lower quality impacted prices in Chandrapur and Daryapur. Farmers advised to plan sales based on storage capacity.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती