Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक घटली पण दर वाढले; 'या' बाजारात ५ हजाराचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:00 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यात आज (१३ नोव्हेंबर २०२५) सोयाबीनची एकूण आवक  (Soybean Arrival) ५१ हजार ४९० क्विंटल इतकी झाली असून, सरासरी दर ४ हजार ५९० रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. 

मागील दोन दिवसांच्या तुलनेत आवक काहीशी घटलेली दिसून आली आहे. तरीही बाजारात दर स्थिर ते वाढीच्या दिशेने असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

बाजार समितीमध्ये किती झाली आवक 

लातूर बाजारात १७ हजार ७३६ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर ४ हजार ६०० पर्यंत पोहोचला.

अकोला येथे दराने झेप घेतली असून, सर्वाधिक दर ५ हजार ९०५ पर्यंत नोंदवला गेला.

यवतमाळ मध्ये उच्चांकी ५ हजार ८५५ रुपये दर नोंदवला गेला.

मलकापूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ९४० रुपये दराने व्यवहार झाले.

नागपूर बाजारात ४ हजार ९८० रुपयांचा दर मिळाला असून मागणी टिकून आहे.

अमरावती, हिंगोली, माजलगाव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या बाजारांमध्येही दर ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दरम्यान राहिले.

आवक घटली पण दरात स्थिरता

सोयाबीनची एकूण आवक मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी दिसत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दर वाढीच्या अपेक्षेने विक्री थांबवली आहे. त्यामुळे बाजारात सध्या मंद पण स्थिर व्यवहार सुरू आहेत.

आजचे दर कुठे किती?

कमीतकमी दर : २,८०० रु. (सोलापूर)

जास्तीत जास्त दर : ५,९४० रु. (मलकापूर)

सर्वसाधारण दर : ४,५९० रु.

राज्यात सोयाबीनला सध्या चांगली मागणी कायम आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही बाजारांत भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ९०० पर्यंत गेले आहेत. हवामान स्थिर राहिल्यास आणि बाजारातील मागणी वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2025
जळगाव - मसावत---क्विंटल6456545654565
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल117402646704348
माजलगाव---क्विंटल1845380047124600
तुळजापूर---क्विंटल115460046004600
सोलापूरलोकलक्विंटल607280049004600
अमरावतीलोकलक्विंटल8052400046004300
जळगावलोकलक्विंटल219400047004600
नागपूरलोकलक्विंटल3638430049804810
हिंगोलीलोकलक्विंटल1325420047004450
दुधणीलोकलक्विंटल13440044954495
लातूरपिवळाक्विंटल17736411149504600
अकोलापिवळाक्विंटल5665420059055570
यवतमाळपिवळाक्विंटल2221585558555855
मालेगावपिवळाक्विंटल38417047004649
चिखलीपिवळाक्विंटल1950405053004675
बीडपिवळाक्विंटल188430047354649
पैठणपिवळाक्विंटल14453045304530
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2200387545804230
मलकापूरपिवळाक्विंटल1760407559405940
सावनेरपिवळाक्विंटल75390045614350
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल44310047704465
गेवराईपिवळाक्विंटल100370047514400
परतूरपिवळाक्विंटल49437547104660
नांदगावपिवळाक्विंटल5454845504550
गंगापूरपिवळाक्विंटल19388545504218
निलंगापिवळाक्विंटल315460048004700
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1611400047524376
किनवटपिवळाक्विंटल48415045004300
मुखेडपिवळाक्विंटल110460048004700
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल35400046004500
सेनगावपिवळाक्विंटल187400045004300
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल255360047004200
उमरखेडपिवळाक्विंटल40440046004500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120440046004500
राजूरापिवळाक्विंटल336351545504395
पुलगावपिवळाक्विंटल255300046004165
देवणीपिवळाक्विंटल177410048504475

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : 'पिवळ्या' जातीला मागणी कायम; सोयाबीन दरात थोडी नरमाई वाचा सविस्तर 

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Rise Despite Reduced Supply; Market Crosses ₹5,000

Web Summary : Soybean arrivals decreased, but prices increased in Maharashtra on November 13, 2025. Akola and Malkapur saw the highest rates, reaching ₹5,905 and ₹5,940 respectively. While overall arrivals are down, demand remains strong, especially in Vidarbha and Marathwada, with expectations of further price increases if conditions stay stable.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती