Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला भाव नाही? की बाजारात पुन्हा तेजी? जाणून घ्या आजचे भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:32 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये  आज (२० नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक (Soybean Arrival)  ५०,४८२ क्विंटल नोंदवली गेली असून सर्वसाधारण बाजारभाव ४,४२७ रुपये प्रति क्विंटल होता.

काही ठिकाणी किमान दर २,५०० पासून तर जास्तीत जास्त दर तब्बल ६,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले.(Soybean Arrival) 

आवकेमध्ये मागील काही दिवसांच्या तुलनेत घट दिसून आली. अनेक ठिकाणी हवामानाचे प्रतिकूल परिणाम, कोरडवाहू पट्ट्यात पिकांचे कमी उत्पादन आणि शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवणे ही प्रमुख कारणामुळे आवक कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(Soybean Arrival) 

कोणत्या बाजारात किती भाव?

उच्च दर देणारे बाजार

वाशीम : ६,००० रुपये / क्विंटल

अकोला : ५,५२५ रुपये / क्विंटल

मलकापूर : ५,४०० रुपये / क्विंटल

जळकोट : ४,८२१ रुपये / क्विंटल

लातूर : ४,७८० रुपये / क्विंटल

या बाजारात पिवळ्या जातीच्या सोयाबीनला अधिक मागणी होती.

मध्यम भाव देणारे प्रमुख बाजार

सोलापूर : ४,७४५ रुपये / क्विंटल

राहूरी-वांबोरी : ४,७५१ रुपये / क्विंटल

सिल्लोड : ४,५०० रुपये / क्विंटल

तुळजापूर : ४,५०० रुपये / क्विंटल

येथे प्रामुख्याने लोकल व हायब्रिड जातींची खरेदी झाली.

कमी भाव असलेले बाजार

धुळे (हायब्रिड) : किमान २,५०० रुपये

राजूरा : ३,२४५ रुपये

मोर्शी : ३,६०० रुपये

कमी गुणवत्तेचा माल व ओलावा असलेला माल येथे जास्त प्रमाणात आल्याने भाव खाली होते.

जातीप्रमाणे मागणी

पिवळ्या जातीला राज्यभरात सर्वाधिक मागणी विशेषत:  वाशीम, अकोला, लातूर, यवतमाळ, बोरी, उमरखेड या ठिकाणी ४,५०० ते ६,००० रुपयांपर्यंत भाव मिळाले.

लोकल सोयाबीनचीही चांगली खरेदी

अमरावती, मेहकर, सोलापूर येथे ४,२००- ४,७०० रुपयांपर्यंत दर.

हायब्रीड मालाची मागणी कमी

धुळे येथे हायब्रिडची गुणवत्ता मध्यम असल्याने दर २,५००- ४,३०० पर्यंत.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल41380046064203
चंद्रपूर---क्विंटल154304544804089
राहूरी -वांबोरी---क्विंटल8450047514625
सिल्लोड---क्विंटल16440045004500
कारंजा---क्विंटल8500401046254375
मुदखेड---क्विंटल14440045004430
तुळजापूर---क्विंटल550450045004500
मोर्शी---क्विंटल252360043003950
धुळेहायब्रीडक्विंटल70250043704200
सोलापूरलोकलक्विंटल170390047454450
अमरावतीलोकलक्विंटल6696390045504225
अमळनेरलोकलक्विंटल100410043004300
मेहकरलोकलक्विंटल900420047004550
ताडकळसनं. १क्विंटल720412545504300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल205305345754491
जळकोटपांढराक्विंटल540455548214700
लातूरपिवळाक्विंटल13382411147804600
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल239400046504300
अकोलापिवळाक्विंटल6174400055255525
यवतमाळपिवळाक्विंटल1181410047004400
परभणीपिवळाक्विंटल200450046004550
वाशीमपिवळाक्विंटल2400410560005600
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल900425047504450
पैठणपिवळाक्विंटल10444644464446
वर्धापिवळाक्विंटल500379047004250
भोकरपिवळाक्विंटल32443146714551
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल292395044004175
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100380045504175
मलकापूरपिवळाक्विंटल1310407054005400
सावनेरपिवळाक्विंटल210350044904325
जामखेडपिवळाक्विंटल184400045004250
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल55420046504450
परतूरपिवळाक्विंटल65440045804500
देउळगाव राजापिवळाक्विंटल45400043524300
गंगापूरपिवळाक्विंटल6340045303751
हादगावपिवळाक्विंटल50440046004500
मुखेडपिवळाक्विंटल54380046504500
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल40400043004200
सिंदखेड राजापिवळाक्विंटल530390044004200
राळेगावपिवळाक्विंटल150350045504200
उमरखेडपिवळाक्विंटल280460047504650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190460047504650
राजूरापिवळाक्विंटल174324543304120
काटोलपिवळाक्विंटल805325047004550
पुलगावपिवळाक्विंटल243315045404255
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल475335047503850
सोनपेठपिवळाक्विंटल172390045004400
बोरीपिवळाक्विंटल98427547004550

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन मार्केटमध्ये आवक घटली; कुठे मिळाला सर्वाधिक दर?

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market: Price fluctuations, arrival updates, and market analysis today.

Web Summary : Soybean arrivals decreased to 50,482 quintals with an average price of ₹4,427. Prices varied widely, from ₹2,500 to ₹6,000. Wasim offered the highest rate. Yellow soybean is in demand. Reduced arrivals are attributed to weather, low production, and farmer storage.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड