Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात संमिश्र चित्र; जळगाव, किनवटला हमीभाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:15 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२० डिसेंबर) सोयाबीनच्याबाजारभावात संमिश्र चित्र पाहायला मिळाले. शासकीय हमीभाव खरेदी सुरू असतानाही खुल्या बाजारात दरात फारशी वाढ न झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा विक्रीचा उत्साह कमी दिसून आला. (Soybean Arrival) 

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये एकूण ४० हजार ३९३ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली आहे.(Soybean Arrival) 

आवक घटली, पण हमीभाव केंद्रांवर गर्दी

नाफेडमार्फत सुरू असलेल्या हमीभाव खरेदीमुळे अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात माल विक्रीऐवजी साठवणूक करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. 

याचा थेट परिणाम बाजार समित्यांतील आवकेवर झाला असून, काही ठिकाणी आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. जळगाव व किनवट येथे हमीभावाने ५ हजार ३२८ रुपये खरेदी झाल्याने या बाजारांमध्ये दर स्थिर राहिले.

पिवळ्या सोयाबीनला अधिक मागणी

राज्यात सर्वाधिक मागणी पिवळ्या सोयाबीनला असल्याचे चित्र आहे. लातूर, जालना, अकोला, उमरेड, जिंतूर, मलकापूर, जाफराबाद आदी बाजार समित्यांमध्ये पिवळ्या सोयाबीनची मोठी आवक झाली. विशेषतः लातूर बाजार समितीत १३ हजार ४७७ क्विंटल इतकी सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली.

कुठे दर जास्त, कुठे कमी?

सोयाबीनचे सर्वाधिक दर ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल जळगाव व किनवट बाजार समितीत मिळाले. जालना बाजारात चांगल्या प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला ५ हजार १०० रुपयांपर्यंत कमाल दर मिळाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे हिंगणघाट (किमान ३ हजार रुपये), जालना (किमान ३ हजार ५०० रुपये) आणि चिखली, बाभुळगावसारख्या बाजारांमध्ये कमी प्रतीच्या मालाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळाले.

विदर्भ-मराठवाड्यात दर स्थिर

अमरावती, अकोला, हिंगोली, चंद्रपूर, पुलगाव या विदर्भातील बाजारांमध्ये सोयाबीनचे सर्वसाधारण दर ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांदरम्यान राहिले. मराठवाड्यातील लातूर, जालना, जिंतूर, मुरुम येथेही साधारण याच पातळीवर व्यवहार झाले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/12/2025
जळगाव---क्विंटल320532853285328
चंद्रपूर---क्विंटल124360044654270
तुळजापूर---क्विंटल642450045004500
अमरावतीलोकलक्विंटल4971400044504225
जळगावलोकलक्विंटल286430044604425
हिंगोलीलोकलक्विंटल1050410046004350
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल185415145994541
लातूरपिवळाक्विंटल13477380047504550
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल82385046004100
जालनापिवळाक्विंटल6205350051004450
अकोलापिवळाक्विंटल3476400046354500
मालेगावपिवळाक्विंटल18431244204312
चिखलीपिवळाक्विंटल1750365047014175
हिंगणघाटपिवळाक्विंटल1385300047603800
उमरेडपिवळाक्विंटल1750350048004250
भोकरपिवळाक्विंटल71427046254447
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल233380044504125
जिंतूरपिवळाक्विंटल488420047504400
मलकापूरपिवळाक्विंटल727400046054340
सावनेरपिवळाक्विंटल29430044004350
जामखेडपिवळाक्विंटल170380045004150
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल34400145214379
किनवटपिवळाक्विंटल380532853285328
मुरुमपिवळाक्विंटल226420044514346
नांदूरापिवळाक्विंटल575370045204520
बोरी-अरबपिवळाक्विंटल21429044054370
बाभुळगावपिवळाक्विंटल1200350147404201
पुलगावपिवळाक्विंटल46410043254250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल352355045004400
जाफराबादपिवळाक्विंटल120440046004500

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन बाजारात विक्रीला 'ब्रेक'; काय आहे कारण वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Price: Latest Updates and Trends

Web Summary : Stay updated on soybean market prices. Current trends affecting soybean values are being closely monitored. Market fluctuations impact farmers and consumers. Prices influenced by supply, demand, and global factors. Detailed analysis provides insights into the soybean market. Check for the latest rates.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती