Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन भाव उसळले की कोसळले? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:03 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात आज मोठा बदल पाहायला मिळाली. काही बाजार समित्यांत सोयाबीनला थेट ६ हजार ३२० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असताना, काही ठिकाणी दर ३ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरले. (Soybean Arrival)

वाढती आवक, प्रतीनुसार दर आणि पुढील आठवड्यातील बाजाराची दिशा याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(Soybean Arrival)

राज्यभरात एकूण सुमारे ३० हजार ७०६ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) झाली असून, सरासरी दर ५ हजार २३७ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला आहे.

मात्र, बाजारनिहाय दरांमध्ये मोठा फरक दिसून येत असून काही ठिकाणी दर घसरले, तर काही बाजारांत सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याचे चित्र आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये पिवळ्या सोयाबीनला उच्च दर मिळाले. वाशीम बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला ६ हजार ३२० रुपये प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला, तर सरासरी दर ५ हजार ५५० रुपये नोंदविण्यात आला.

बाभुळगाव बाजारात कमाल दर ६ हजार ५५ रुपये, तर सरासरी ५ हजार ७०१ रुपये राहिला. जालना बाजारातही पिवळ्या सोयाबीनला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे, अमरावती बाजार समितीत मोठी आवक असूनही सरासरी दर ४ हजार ७७५ रुपये इतकाच राहिला. चंद्रपूरमध्ये किमान दर ४ हजार रुपये नोंदविण्यात आला, तर काही बाजारांत कमी प्रतीच्या सोयाबीनमुळे दरांवर दबाव दिसून आला. हिंगणघाट बाजारात किमान दर ३ हजार ४०० रुपये असल्याने तेथील शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

लोकल व हायब्रीड सोयाबीनच्या दरातही तफावत दिसून आली. सोलापूर बाजारात लोकल सोयाबीनला ५ हजार ४६५ रुपये कमाल दर, तर नागपूरमध्ये सरासरी ५ हजार १८३ रुपये दर मिळाला. धुळे बाजारात हायब्रीड सोयाबीनचे दर ४ हजार ९०० ते ५ हजार १७५ रुपये दरम्यान राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/01/2026
जळगाव---क्विंटल120532853285328
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6475047504750
चंद्रपूर---क्विंटल38400052955200
तुळजापूर---क्विंटल155540054005400
राहता---क्विंटल28500053005250
वडवणी---क्विंटल1520052005200
धुळेहायब्रीडक्विंटल14490051755100
सोलापूरलोकलक्विंटल51540554655440
अमरावतीलोकलक्विंटल5148430052504775
जळगावलोकलक्विंटल5230523052305230
नागपूरलोकलक्विंटल680450054115183
अमळनेरलोकलक्विंटल10450050005000
हिंगोलीलोकलक्विंटल500500054005200
वडूजपांढराक्विंटल50533053505340
जालनापिवळाक्विंटल5381420060006000
अकोलापिवळाक्विंटल5271420053505345
हिंगणघाटपिवळाक्विंटल1210340053755350
वाशीमपिवळाक्विंटल3300483563205550
भोकरदनपिवळाक्विंटल60480050004900
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल254480053005050
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल800533056505490
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल20400053855385
औराद शहाजानीपिवळाक्विंटल675520054335375
उमरखेडपिवळाक्विंटल120475049004800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60475049004800
बाभुळगावपिवळाक्विंटल1250420160555701
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल274385053005250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Chana Tur Market Update : हरभऱ्याला उतरती कळा; तुरीचे दर थेट 'इतक्या' हजारांच्या पार वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Fluctuate: Market Analysis and Detailed Price Report

Web Summary : Soybean prices in Maharashtra markets show significant variation. While some markets offer up to ₹6,320 per quintal, others see prices drop to ₹3,400. The average price is ₹5,237 with an arrival of 30,706 quintals. Farmers are closely watching market trends for future direction.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड